कोर्सेस

Source :    Date :24-Jun-2019
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या विविध शाखांतून पूर्वप्राथमिक वर्गात महाराष्ट्र शासन मान्य अभ्यासक्रम, तसेच मुंबई विद्यापीठाशी संलग्नकला वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम शिकवला जातो. मातृभाषेतून शिकवण्याबरोबरच काळाबरोबर राहण्यासाठी संस्थेची एक इंग्रजीमाध्यमाची शाळा असून तेथे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण तिथे दिले जाते.
 
शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील उपेक्षित अशा कष्टकरी आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच ,सुधारितनागरी जीवनाचा परिचय व्हावा म्हणून निवासी आश्रम शाळा चिंध्याचीवाडी येथे कार्यरत आहे.
 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र, संस्थेच्या राणाप्रताप भवन येथे सुरू आहे. या अभ्यास केंद्रावर शालेयव्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचे आयोजन केले जाते. या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.