ABOUT US

Source :    Date :24-Jun-2019
शाळेची स्थापना 
श्रीयुत बाबासाहेब मोकाशी यांच्या “घरकुल” या निवासस्थानी “स्वामी विवेकानंद विद्यामंदिर” या शाळेची स्थापना रामकृष्ण मिशनच्या स्वामी राकानंदजी यांच्या शुभहस्ते झाली. त्यावेळी आठ विद्यार्थ्यांसह या शैक्षणिक अधिष्ठानाची मुहूर्तमेढ रोवली गेली.मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या रोपट्याचे भव्य अशा शैक्षणिक वटवृक्षात रूपांतर होताना, आजमीतीला यात, सहा पूर्वप्राथमिक, सहा प्राथमिक, सहा माध्यमिक शाळा ,एक इंग्रजी माध्यमाची प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच एक कला व वाणिज्य विभाग असलेले ठाणे परिसरातील पहिले रात्र महाविद्यालय आहे. याच बरोबर एक सामाजिक बांधिलकीचा उपक्रम म्हणून कसाऱ्याजवळ ग्रामीण भागात चिंध्याची वाडी या परिसरात जवळजवळ साडेचारशे आदिवासी मुले-मुली पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत.

संस्थेचे आज जे रूप दिसत आहे ते मूर्त स्वरूपात आणण्यासाठी प्रारंभी, संस्थेच्या आर्थिक अडचणीच्या काळात, येथील सुशिक्षित महिलांनी नाममात्र वेतनावर अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीतून जाण्यासाठी कै. श्री. अण्णा नाबर तसेच कै. सुधाताई साठे यांच्यासारख्या संस्थेच्या असंख्य कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य आहे.

1984 - 85 या वर्षात राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे स्वतंत्र कार्यालय राणा प्रताप भवन विष्णू नगर डोंबिवली येथे स्वतंत्र खोलीत सुरू झाले.

देश-विदेशात या शाळांचे असंख्य माजी विद्यार्थी अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळवून सन्मानाने कार्यरत आहेत . आपल्या शाळेला आजही ते अभिमानाने आठवण ठेवून भेट देतात. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या यादीत आजची प्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती सौ ऐश्वर्या नारकर, निर्माता दिग्दर्शक रवी जाधव ,अजित देवळे, सूत्रसंचालक सुवर्णा जोशी, संगीतकार तुषार देवल, साहित्यक्षेत्रातील राजस वैशंपायन ,वैद्यकीय क्षेत्रातील कर्करोगतज्ञ डॉक्टर विश्वनाथ मसुरकर, कबड्डीपटू निलेश शिंदे ही उदाहरणादाखल यातील काही नावे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा तसेच दातृत्वाचा संस्थेला कायमच अभिमान वाटत आला आहे. तो संस्थेचा एक अमूल्य ठेवा आहे.

अशा अनेक विद्यार्थ्यांपैकी, काहीजण गुणवत्ता यादीत चमकले आहेत. दत्तनगर शाखेची कुमारी तेजस्विनी खैराटकर ही शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील बाराव्या क्रमांकावर आली होती. गुणवत्ता यादीत येणारी संस्थेच्या शाळांची ती पहीलीच विद्यार्थिनी होय.

1995 या वर्षांत विष्णुनगर शाळेच्या एकूण सात विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत अव्वल क्रमांक पटकावला होता. यापैकी कुमारी अपर्णा गोळे यादीत पहिल्या क्रमांकावर व कुमार अनिष खांडेकर दुसर्‍या क्रमांकावर आले होते.

या संस्थेच्या विविध शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार घडविणारा शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना, समाजाला व संस्थेला कायम वंदनीय आहे. या मध्ये, सौ. सुहासिनी कुलकर्णी, सौ. आसावरी दामले , सौ.स्मिता शिधये , सौ प्रिया महाबळेश्वरकर , सौ. शिरगोपीकर, सौ शैलजा जोशी , सौ. दीपाली काळे , सौ ज्योती वानखेडे , सौ. डोके बाई. ही काही नावं. अशाप्रकारे येथे उल्लेख केला नाही असे अनेक विद्यार्थीप्रिय शिक्षक संस्थेच्या शाळांत कार्यरत होते आणि आहेत.

संस्थेच्या विविध शाळांमधून सध्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेच मार्गदर्शन केंद्र सुरु केलंय. तसेच शिष्यवृत्ती परीक्षांसाठी शिक्षक वृंद विद्यार्थ्यांची तयारी करून घेत आहे.

संस्थेचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम सन 1993 मधे संपन्न झाला. 2018 च्या , सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या सांगता समारंभाला नागालँड चे राज्यपाल श्री. पद्मनाभ आचार्यजी उपस्थित होते.

आगामी काळात संस्था तंत्रज्ञानकेंद्रीत विकासावर भर देऊन . शाळांचे वर्ग डिजिटल करणार आहे.

दिनांक 3 मार्च 1987 रोजी संस्थेच्या सुधारित घटनेला मा. धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी मिळाली.

त्यावेळी संस्थेची कार्यकारिणी 1979 ते 85 साठीची अशी होती -
अध्यक्ष: श्री. प्र. शं. वाणी
उपाध्यक्ष: प्रा. न.रा. साखळकर
उपाध्यक्ष व विश्वस्त: सौ सुधा भा साठे.
कार्यवाह : श्री द. ह. हळदीकर
कोषाध्यक्ष: श्री. बा. रा. पिसे.
ऊप कार्यवाह: श्री. बा. वा. भागवत
श्री. प्रा. अ. र. पेंडसे
विश्वस्त: सर्वश्री म. गो. मोकाशी, श्री. पोंक्षे,
अॅड. श्री. ग. गडकरी, शं. द. जोशी

नवीन घटनेनुसार प्रथम व्यवस्थापन समिती 1987 ते 1992 या कालावधीसाठी 26/04/1987 ला नीवडण्यात आली. ती अशी :
अध्यक्ष: श्री. द. ह. हळदीकर
उपाध्यक्ष : सौ सुधा भा साठे
कार्यवाह: श्री बा. वा. भागवत
सहकार्यवाह: श्री. रा. मो. अंतुरकर
कोषाध्यक्ष: श्री. अच्युत स. खरे
सभासद : सर्वश्री वाणी, गडकरी, साखळकर, जोशी, सरपोतदार, करमरकर, प्रभुदेसाई, शेंबेकर कोल्हटकर, शशिकांत भाट्ये

संस्थेचे सध्याचे कार्यकारी मंडळ 2018 ते 2023 या कालावधीसाठी साठी निवडले गेले आहे.
अध्यक्ष: डॉ. श्री. सुभाष कृष्णा वाघमारे
उपाध्यक्ष: श्री. विलास चिंतामण जोशी
कार्यवाह: श्री. दीपक गोपाळ कुलकर्णी
सहकार्यवाह: श्री. प्रमोद अनंत उंटवाले
कोषाध्यक्ष: श्री. शिरीष कृष्ण फडके
सदस्य: श्री. शशिकांत लक्ष्मण कर्डेकर
डॉ. श्री. शरद महादेव धर्माधिकारी
श्री. संजय बळवंत कुलकर्णी
श्री. विद्याधर मधुसूदन शास्त्री
डॉ. सौ. सरोज जितेंद्र कुलकर्णी
अॅड. सौ. वैभवी विनोद भार्गव
श्री. रविंद्र वामन जोशी
श्री अरुण धोंडीराम ऐतवडे
श्री. नरेंद्र कृष्णाजी दांडेकर