विद्यार्थ्यांनी दिला वृक्ष लागवडीचा संदेश

Source :    Date :12-Oct-2019
विद्यार्थ्यांनी दिला वृक्ष लागवडीचा संदेश




                                                                     "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षी ही सुस्वरे आळविती "
                संत तुकारामांनी वृक्षांना आपले सोबती ,सखे मानले . पण आजकाल दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे विविध समस्या आपणा समोर आ वासून उभ्या आहेत. या सर्व समस्यांपासून आपल्याला सुटका पाहिजे असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची गरज आहे . यासाठीच स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत .दिनांक ०१ जुलै २०१९ रोजी "एक विद्यार्थी एक वृक्ष" हा उपक्रम राबवण्यात आला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार मा. श्री. भगवान मंडलिक होते. तसेच शाळा समितीचे श्री. रवींद्र जोशी सर ,सौ.वैभवी भार्गव मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेडे मॅडम उपस्थित होत्या . 
          प्रथम सर्वानी भारतीय संस्कृतीचे प्रतीक असणाऱ्या तुळशीच्या रोपट्याचे पूजन केले . रोपट्याचे औक्षण केले. त्यानंतर शालेय परिसरात विविध झाडे लावण्यात आली.