हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलणारं ,अलवार स्पंदन .... रक्षाबंधन!!!

Source :    Date :13-Oct-2019
 हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलणारं ,अलवार स्पंदन .... रक्षाबंधन!!!
 
 
 
 
              रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचं अतूट नातं ! या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते..जगातील सर्व नात्यांमध्ये भावा बहिणीचे नाते हे सर्वात पवित्र मानले जाते. या दिवशी भाऊही बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. श्रावण पौर्णिमेस राखी बांधली जाते. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे,रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचा नित्य नियमित वाहणारा निर्झर !भाव -बहिणीच्या प्रेमाचा संदेश देणारा हा सण म्हणजे भारतीय संस्कृतीचा अमोल ठेवा आहे.
          १४ ऑगस्ट २००१९ आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत "रक्षाबंधन "हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्गा- वर्गात विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना भेटवस्तू दिली. आपले सण व उत्सव समारंभ ,परंपरा विद्यार्थ्यांना माहित करून देणे हा या मागचा उद्देश आहे     .