स्वातंत्र्य दिन व समूहगान स्पर्धा

Source :    Date :13-Oct-2019
             
स्वातंत्र्य दिन  व समूहगान स्पर्धा   
 

      १५ ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिवस ! याच दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपली भारतमाता इंग्रजांच्या पारतंत्र्याच्या शृंखलातून मुक्त झाली. म्हणूनच हा दिवस आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान करणाऱ्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना प्रणाम करण्याचा हा दिवस. १५ ऑगस्ट जवळ आला की विद्यार्थ्यांची लगबग सुरु होते ती समूह गीतांचा सराव करण्याची . अगदी शिशु-बाल वर्ग पासून ते ७वी पर्यंत सर्वच मुले वर्गा-वर्गात समूह गीतांचा सराव करतात . वर्गावर्गात क्रमांक पटकावण्याची आपापसात जणू शर्यतच लागलेली असते.
         १४ ऑगस्ट २०१९ रोजी आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत "समूहगान स्पर्धा" घेण्यात आली. इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी १४ देश भक्तिपर गीते म्हटली. प्रत्येक वर्गातून ०१ असे एकूण ०७
क्रमांक काढण्यात आले. परीक्षक म्हणून आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती वानखेडे व सौ.सुप्रिया फडके यांनी काम पाहिले.१५ ऑगस्ट २०१९ रोजी यातील क्रमांक प्राप्त समूहगीते सादर करण्यात आली.
        १५ ऑगस्ट २०१९ रोजी मा,श्री.प्रल्हादजी म्हात्रे यांच्या हस्ते सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळा समिती सदस्य श्री. रवींद्र जोशी , सौ. वैभवी भार्गव मॅडम ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती वानखेडे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.