स्वच्छ सुंदर शाळा,निरोगी आयुष्य देई बाळा...

Source :    Date :15-Oct-2019

स्वच्छ सुंदर शाळा,निरोगी आयुष्य देई बाळा...

दि.२ ऑक्टो. २०१९ रोजी सकाळी ८ वाजता . गांधीजी आणि लालबहादूर शास्त्रींची जयंती शाळेमध्ये उत्साहात साजरी केली गेली. ह्या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक मा. पाटील सर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .ह्या वेळी विद्यार्थांनी म. गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी चे कार्य, त्यांचे चरित्र इ. ची छान माहिती सांगितली .

ह्याच निमित्ताने मुलांनी शाळेमध्ये स्वच्छता अभियान राबवले . सर्व विद्यार्थांनी अतिशय आनंदाने व उत्साहाने आपले वर्ग ,शाळा,शाळेचे मैदान ,व शाळेचा परिसर स्वच्छ केला .आपली शाळा नेहमी स्वच्छ व सुंदर ठेऊ अशी शपथ घेतली