अतूट बंध नात्याचे.............. मातृदेव भव !!!!

Source :    Date :18-Oct-2019
अतूट बंध नात्याचे..............     मातृदेव भव !!!!
"आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवना आकार
मायेचा सागर , जीवना आधार "......


 
 
 
         स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी सर्व विद्यार्थी व माता पालक यांनी हर्षोल्लासात मातृदिन साजरा केला . भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत पारंपरिक पद्धतीने विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या आईचे पूजन केले . हळद, कुंकू, अक्षदा ,फुले हि सर्व तयारी विद्यार्थियांनीच केली . अतिशय सात्विक पद्धतीने हा उपक्रम आमच्या विद्यामंदिरात संपन्न झाला.   
             मुख्याध्यपिका सौ. वानखडे बाईंचे पूजन देखील पालकांनी करून एक नवा इतिहास रचला. आईला मुलांनी औक्षण करून पेढा भरविला . तसेच छान स्वतः हाताने बनविलेले ग्रीटिंग दिले. आई म्हणजे दैवत,या प्रत्येकाच्या घरातील या दैवताची अशी दररोज पूजा आम्ही करणार अशी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
आई काय आहे याचे वर्णन करताना कवी म्हणतात,
आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
मुलांनो शिकणे अ, आ, ई
तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी
कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई