"आजी आजोबा येति घरा ......"या एकांकिकेने रसिक प्रेक्षकांची जिंकली मने

Source :    Date :09-Oct-2019
"आजी आजोबा येति घरा ......"या एकांकिकेने रसिकप्रेक्षकांची जिंकली मने

            श्रीकला संस्कार डोंबिवली आयोजित बालनाट्य स्पर्धा दिनांक २३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०१९ या कालावधीत सावित्रीबाई फुले नाट्यगृहात पार पडल्या.या बालनाट्यस्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेने सादर केलेल्या श्री. भरत तळवणेकर लिखितश्री.शांताराम अहिरे दिग्दर्शित "आजी आजोबा येति घरा ......" या एकांकिकेने रसिकप्रेक्षकांची मने जिंकली.सदर एकांकिकेला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले . या एकांकिकेत आर्याची भूमिका साकारणा ऱ्या कु. अनुष्का सुधीर राजपुरे हिस विशेष लक्षवेधी अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती वानखेडे मॅडम यांनी कु..अनुष्का राजपुरे हिचे व संपूर्ण एकांकिकेच्या टीमचे कौतुक केले.
           आजी -आजोंबांचे घरातील महत्वाचे स्थान पटवून देणाऱ्या या एकांकिकेतील काही प्रसंग पाहताना नकळत रसिक प्रेक्षकांच्या डोळ्याच्या पापण्या पाणावल्या.