स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत "पर्यावरणपूरक बाप्पा "

Source :    Date :09-Oct-2019
                   स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत "पर्यावरणपूरक बाप्पा "

 
         दिनांक २९ सप्टेंबर २०१९ रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत "पर्यावरणपूरक बाप्पा " हा उपक्रम राबवण्यात आला. निसर्गाची हानी टाळून पर्यावरणपूरक शाडुच्यामातीपासून गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली . इयत्ता ४ थी ते इयत्ता ७ वी पर्यंतचे सुमारे ३५५ विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेडे यांनी शाडू मातीचे पूजन करून या कार्यशाळेचा शुभारंभ केला. विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात उत्साहाने आपल्या कल्पनेतील बाप्पा शाडुच्यामातीतून साकारला व समाजाला पर्यावरणाची हानी थांबविण्याची सुरुवात स्वतःपासून करावी हे दाखवून दिले .
         या पर्यावरणपूरक बाप्पांच्या मुर्त्यांचे पालकांसाठी प्रदर्शन दिनांक ३० सप्टेबर २०१९ रोजी भरविण्यात आले. सदर उपक्रमास पालकांचा उस्फुर्त सहभाग लाभला.