अरुणोदय प्राथमिक शाळेत गोकुळअष्टमी निमित्त पुस्तकांची दहीहंडी

Source :    Date :28-Aug-2019
डोंबिवलीत प्रथमच पुस्तकांची दहीहंडी.स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत गोकुळअष्टमी निमित्त पुस्तकांची दहीहंडी व श्रावणी शुक्रवार हा अभिनव उपक्रम मा.मुख्याध्यापिका सौ.वानखेड़े मॅडम यांच्या संकल्पनेतून व सर्व शिक्षकांच्या सहकार्यने साजरा झाला.

 
 
राष्ट्रीय संस्था डोंबिवली कार्यकारणी सदस्य श्री.जोशी सर व श्री.देशपांडे सर ,शिक्षक वृन्द,पालक शिक्षक संघ प्रतिनिधी व बहुसंख्या विद्यार्थी पालक यांनी सदर कार्यक्रमचा आंनद लुटला.
 
इयत्ता 1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यानी अवांतर वाचनाची 800 पुस्तके लूटली.वाचन संस्कृतिचे जतन व्हावे व भारतीय धर्मीक सणात अंतर्भूत आरोग्य व विज्ञान समजावे व भारतीय सांस्कृती व परंपरा यांचे जतन व्हावे या हेतुने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.