सावित्रीबाई यांना अनोखी आदरांजली,विद्यार्थिनींनी केली सावित्रीबाई यांची वेशभूषा

Source :    Date :04-Jan-2020

सावित्रीबाई यांना अनोखी आदरांजली,विद्यार्थिनींनी  केली सावित्रीबाई यांची वेशभूषा

blikadin_1  H x

balikadin_1  H  
 उद्धारण्या भारतमातेच्या लेकी,
माय दिली तू सुखाला आहूती.
तुझ्याचमुळे ग तेवत आहेत,
सावित्री माय जगती ज्ञानज्योती.

         भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणजे सावित्रीबाई फुले . त्यांचे विचार, त्याची शिकवण ही नेहमीच सर्वांसाठी विशेषत: महिलांना प्रेरणा देणारी आहे. समाजातील रूढी, परंपरा बाजूला सारून, लोकांचा रोष पत्करून त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना साक्षर केले आणि पुढे जाऊन याच सावित्रीबाईंनी बुरसटलेल्या विचारांच्या लोकांमध्ये जाऊन अनेक महिलांना एकत्र करुन त्यांनाही साक्षर केले. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने त्यांनी पुढे नेला.अशा या जगात ज्ञानज्योती प्रज्ज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.

        आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत शुक्रवार दि 03 जानेवारी 2020 रोजी मुलींसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजेच बालिकादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस शाळेच्या  सन्मानीय मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेडे यानी पुष्पाहार अर्पण केला.त्यानंतर श्री.अहिरे सर यानी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला.सावित्रीबाई फुले यांची जयंती "बालिका दिन" म्हणून का साजरी केली जाते हे पटवून सांगितले.सावित्रीबाई यांच्या जीवन प्रवासाची ध्वनीफित ऐकवण्यात आली.या दिवशी विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून आल्या होत्या.नंतर सावित्री बाई यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे विद्यार्थ्यांनी सादर केली.काही विद्यार्थ्यांनी कवितेतून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सलाम केला.

     शेवटी शाळेच्या सन्मानीय मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेडे यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला .

balikadin_10  H
balikadin_9  H
balikadin_7  H
balikadin_6  H
balikadin_5  H
balikadin_3  H
blikadin_2  H x
blikadin_1  H x