शिस्त व स्वसंरक्षण काळाची गरज ..............मा.श्री.सोनावणे

Source :    Date :27-Feb-2020
         शिस्त व स्वसंरक्षण काळाची गरज ........मा.श्री.सोनावणे 
 
pic_1  H x W: 0
     शाळा हे मुलांना घडविण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. शाळांमध्ये मुलांना केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण दिले जाते असे नाही, तर जीवनात आपण कशाप्रकारे यशस्वी झाले पाहिजे, याची शिकवणही दिली जाते. तसेच शालेय जीवनात मुलांना शिस्तपालनाचे धडेही दिले जातात. शिस्तपालन हा यशस्वी जीवनाचा पाया मानला जातो. त्यामुळे मुलांच्या अंगी शिस्त उतरविली पाहिजे. प्रत्येक काम वेळेत आणि नियमात करण्याची सवय मुलांना लागणे गरजेचे आहे. तसेच आपले स्वसंरक्षण आपण कसे कराव , हे सुद्धा विद्यार्थ्यांना समजणे आवश्यक आहे.जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी याबाबत जागृत राहून समाजात वावरले तर आज शालेय विद्यार्थ्यांबाबत वर्तमान पत्रातून ज्या बातम्या वाचायला मिळतात त्या निश्चितच कमी होतील.याच उद्देशाने आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२० रोजी ‘शिस्त व स्वसंरक्षण 'या विषयावर पोलिसांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
        यावेळी व्यासपीठावर विष्णूनगर पोलीस स्टेशन ,डोंबिवली पश्चिमचे पी.एस.आय. मा.श्री.सोनावणे  व श्री.म्हस्के  उपस्थित होते.सर्वप्रथम शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.वानखेडे यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन पी.एस.आय. मा.श्री.सोनावणे  व मा.श्री.म्हस्के यांचे स्वागत केले. पोलिसांनी विद्यार्थ्याना समाजातील संभाव्य धोके कोणते आहेत ते सांगितले.तसेच या धोक्यापासून आपण आपला बचाव कसा करावा या विषयी मार्गदर्शन केले.पालक व विद्यार्थ्यांनी एखादा पासवर्ड तयार करावा व एखादी अनोळखी व्यक्ती काही तरी कारण सांगून विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी आली असेल तर तो पासवर्ड विचारावा जेणे करून संभाव्य धोका टळू शकतो असे आवाहन केले.वाहतुकीचे नियम समजून घेऊन त्याप्रमाणे रस्ता ओलांडावा तसेच वाहतुकीचे नियम आपण पाळावेत व इतरानांही पाळावयास सांगावे असे आवाहनही केले.विद्यार्थिनींनी कोणती  दक्षता घेणे गरजेचे आहे तेही सांगितले.पालक व विद्यार्थी या दोघानाही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.यावेळी इयत्ता ५ वी ते ७ वी चे एकूण ३५० विद्यार्थी , पालक प्रतीनिधी व शिक्षक उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री.शांताराम अहिरे यांनी केले.

26 feb._1  H x
26 feb._2  H x
26 feb._3  H x
26 feb._4  H x
26 feb._5  H x
26 feb._6  H x
26 feb._7  H x