विद्यार्थ्यांनी दिला लोकमान्य टिळकांच्या स्मृतींना उजाळा

Source :    Date :02-Aug-2020

विद्यार्थ्यांनी दिला लोकमान्य टिळकांच्या स्मृतींना उजाळा

टिळक_1  H x W:  
         भारतमातेला इंग्रजांच्या पारतंत्र्याच्या श्रृंखलांतून मुक्त करण्यासाठी ,भारत मातेच्या उद्धारासाठी तन ,मन आणि धन अर्पण करणारी अनेक रत्ने या भारतभूमीत जन्माला आली.भारतीय जनतेत ‘स्व’राज्याची व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे; तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे एक युगप्रवर्तक राष्ट्रीय नेतृत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक!!!!! 
           आपल्या भारतमातेच्या अशा या थोर सुपुत्रांचे स्मरण म्हणजे कर्तृत्वाच्या प्रेरणेचा अखंड स्रोत. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला बोध , मार्गदर्शन व स्फूर्ती मिळते.अशा या ‘लोकमान्य’ पदवी प्राप्त झालेल्या ध्येयवादी आणि थोर व्यक्तीमत्त्वाची १ ऑगस्ट या दिवशी पुण्यतिथी साजरी केली जाते.
            राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय, प्राथमिक शाळेतही शनिवार दिनांक ०१ ऑगस्ट २०२० रोजी "लोकमान्य टिळक पुण्यतिथी" Online पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी झाली. या दिवसाचे औचित्य साधून इयत्ता २री ते इयत्ता ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी "वक्तृत्व"स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.इयत्ता २री ते इयत्ता ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी "लोकमान्य टिळकांची माहिती सांगणे" व इयत्ता ५वी ते इयत्ता ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी "लोकमान्य टिळक - गणेशोत्सव" असे विषय देण्यात आले.विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषणाचे चित्रीकरण करून सदर चित्रफित आपल्या वर्ग शिक्षकांना Whatsapp च्या माध्यमातून पाठवली.या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती राजेन्द्र वानखेडे यांच्या सुनियोजनामुळे हा उपक्रम व्यवस्थितरित्या पार पडला.
 
स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थी
इयत्ता २री ते इयत्ता ४थी  
          
 
 
इयत्ता ५वी ते इयत्ता ७वी