21 जून 2021 "आंतरराष्ट्रीय योगदिन" स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरुणोदय माध्यमिक शाळेत साजरा

Source :    Date :27-Jun-2021
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरुणोदय माध्यमिक
 

yogdin2021-2_1   
21 जून 2021 "आंतरराष्ट्रीय योगदिन" स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरुणोदय माध्यमिक शाळेत साजरा
 
भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण मह्त्व आहे. योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेऊ शकतो,त्याचप्रमाणे मनावरही योग्य नियंञण ठेवता येते.
                                                              "योग असे जेथे
                                                               आरोग्य वसे तेथे"
   
yogdin2021-3_1  
 
21 जून 2021 "आंतरराष्ट्रीय योगदिन" स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरुणोदय माध्यमिक शाळेत साजरा
या वेळी शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री. नरेंद्रसिंग पाटीलक्रीडा शिक्षक श्री. रविंद्र पवार तसेच सर्व सह.शिक्षक, विद्यार्थी, पालक हे आभासी पद्धतीने उपस्थित होते.सकाळी 7.00 गूगल मीट याद्वारे खालीलप्रमाणे प्रात्यक्षिके घेण्यात आली.
१. प्रार्थना
२.पूरक हालचाली
३.सूर्यनमस्कार
४.उभी आसने
५.बैठी आसने
६.पोटावर झोपून करावयाची आसने
७. पाठीवर झोपून करावयाची आसने
८. प्राणायाम प्रकार
९. ध्यान, शांतीपाठ
या क्रमाने योगप्रात्यक्षिकांचे सादरीकरण क्रीडा शिक्षक श्री.रविंद्र पवार यांनी केले व सह.शिक्षक, विद्यार्थी, पालक हे आभासी पद्धतीने सहभागी होऊन आपल्या सुदृढ आरोग्यासाठी योगसाधनेचा संकल्प केला.
 

yog din 2021_1   
yogdin2021-4_1