अरुणोदय शाळेत गोकुळाष्टमी निमित्त "चित्रकला स्पर्धा "

Source :    Date :03-Sep-2021
 
         अरुणोदय शाळेत गोकुळाष्टमी निमित्त "चित्रकला स्पर्धा "

गोपाळकाला_5  H  
         “उत्सवप्रियः खलु मनुष्यः” असे महाकवी कालिदास यांनी म्हटले आहे. आणि ते शंभर टक्के बरोबर आहे. माणूस हा खरोखर उत्सवप्रिय आहे. त्यामुळेच भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सवांना विशेष महत्व आहे. सण असो किंवा कोणताही समारंभ असो, त्यात सर्वजण उत्साहाने ,आनंदाने सहभागी होतात.सण, उत्सव, व्रते,समारंभ या स्वरुपात आपल्याला थोर दीर्घकालीन वारसा लाभला आहे.हा वारसा आपण आजतागायत जोपासलाआहे, विषेश म्हणजे भारतीय संस्कृती ही आजपर्यत टिकून आहे, त्याचे सर्वात जास्त श्रेय येथील सण आणि उत्सवांनाच आहे.कारण प्रत्येक सण हा या देशाच्या वेगवेगळ्या संस्कृतिचे प्रतिक आहे. प्रत्येक सणात आपल्या संस्कृतिचे प्रतिक दिसते.
           श्रावण महिन्याचे आगमन होताच अनेक उत्सव व सण यांची चाहूल लागते.पौर्णिमेनंतर श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मोठ्या उत्साहात ‘गोकुळाष्टमी’ म्हणजे कृष्ण जन्म दिवस साजरा केला जातो.मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता तो दिवस श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीचा होता.म्हणून यादिवशी ‘गोकुळाष्टमी’ म्हणजेच कृष्ण जन्म दिवस साजरा केला जातो.याच्याच दुसऱ्या दिवशी ‘गोपाळकाला’ किंवा ‘दहीहंडी’ मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
           दरवर्षी मोठ्या उत्साहात ‘गोपाळकाला' साजरा केला जातो.पण सध्या कोरोनासारख्या जागतिक संकटामुळे पूर्ण जग थांबले आहे.शाळाही याला अपवाद नाही.जरी प्रत्यक्ष "गोपाळकाला" साजरा करू शकलो नसलो तरी या दिवसाचे औचित्य साधून आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय ,प्राथमिक शाळेत मंगळवार दिनांक ३१ऑगस्ट २०२१ रोजी इयत्ता १ली ते इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दहीहंडी उत्सव’ या विषयावर आधारित Online पद्धतीने ‘चित्रकला स्पर्धा’ घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने दहीहंडीची चित्रे रेखाटून ती Whatsapp च्या माध्यमातून वर्गशिक्षकांना पाठवली.शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.सुनित पांडुरंग वारके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

गोपाळकाला_4  H
गोपाळकाला_3  H
गोपाळकाला_2  H
गोपाळकाला_1  H