अरुणोदयच्या विद्यार्थ्यांनी सादर केला जिल्हा पातळीवर विज्ञान प्रकल्प

18 Oct 2019 19:29:35
अरुणोदयच्या विद्यार्थ्यांनी सादर केला जिल्हा पातळीवर विज्ञान प्रकल्प


     'जिज्ञासा ट्रस्ट' ठाणे बालविज्ञान परिषद तर्फे घेण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिकच्या कु . मृणाली युवराज पाटील इयत्ता ६वी व कु .भूषण कदम इयत्ता ७ वी यांनी भाग घेऊन जिल्हा पातळीवर आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. 'स्वच्छ, हरित, आरोग्य संपन्न देशासाठी विज्ञान तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पना' या विषय अंतर्गत लहान 'मुलांमधील सवयींचा आरोग्यावर होणार परिणाम अभ्यासणे' हा प्रकल्प सादर केला होता .त्यांच्या या प्रकल्पाची जिल्हा पातळी पर्यंत निवड झाली होती.त्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ.ज्योती वानखेडे बाईंनी त्यांचे कौतुक केले व ह्या अनुभवाचा पुढील वर्षी सुद्धा सहभाग घेऊन उपयोग करा असा आशीर्वाद ही दिला .
Powered By Sangraha 9.0