तास कार्यानुभवचा ..............आनंद स्वनिर्मितीचा

27 Oct 2019 10:44:04
तास कार्यानुभवचा ..............आनंद स्वनिर्मितीचा
 


        डोंबिवली नगरीतील नामवंत शिक्षण संस्था म्हणजे 'राष्ट्रीय शिक्षण संस्था'. या शिक्षण संस्थेच्या सर्व  शाळांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देत वर्षभर वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात. कार्यशाळा, स्पर्धा, शिबिरे, आनंदमेळा इ. स्वरूपाच्या अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता विकसित करण्याबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने विचार केला जातो.आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत दि.  २३ ऑक्टोबर २०१९ रोजी कार्यानुभव अंतर्गत विविध वस्तू बनवण्यात आल्या. इयत्ता ५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांनी 'आकाशकंदील' व इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी 'वॉलपीस ' तयार केलेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पना वापरून अतिशय सुंदर अशा वस्तू बनवल्या.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्वनिर्मितीचा आनंद ओसंडून वाहत होता.
 

Powered By Sangraha 9.0