स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरूणोदय

Source :    Date :08-Aug-2019
जय हिंद कॉलनी मधील एक शिक्षणप्रेमी नागरिक श्री. सुभाष रेंघें यांच्या निवासस्थानी, "स्वामी विवेकानंद विद्यामंदीर," अरुणोदय शाळेची स्थापना सन 1970 मध्ये झाली. डोंबिवली पश्चिम येथे राष्ट्रीय शिक्षण संस्थेची ही दुसरी शाळा होय. सुरुवातीला एकूण नऊ विद्यार्थी येथे होते. 2री पर्यंतचे वर्ग श्रीयुत रेंगे यांच्या घरी भरत होते. नंतर त्यांच्याच निवासस्थानी एक शेड बांधून तेथे शाळेचे वर्ग भरू लागले.
 


 
या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते कै. दिवाकर करमरकर, श्री. द. ह. हळदीकर प्रा. पेंडसे आणि श्री रेंघें यांनी बँकेमधून कर्ज काढून शाळेच्या गरजा पुरविल्या. कालांतराने अरुणोदय सोसायटी मध्ये शाळे करता एक प्लॉट उपलब्ध झाला. या प्लॉटवर टप्प्याटप्प्याने शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. "राजा संभाजी" भवन असे त्याचे नामकरण झाले. येथे, सन 1989 मध्ये माध्यमिक शाळा विना-अनुदानित तत्त्वावर सुरू झाली. सन 1992 पासून अरुणोदय माध्यमिक शाळेला अंशतः आणि सन 1996 -1997 पासून 100% अनुदान प्राप्त झाले.