गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या पंखास बळ

Source :    Date :11-Oct-2019
 दि.७/१०/२०१९ रोजी तुकारामनगर भागात राहणारे दानशूर नागरिक श्री.कृष्णकांत रत्नकांत भानुशाली यांनी ,स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेतील एक गरजू विद्यार्थ्यास आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने रुपये ११११/ रक्कम चेकने   सन्मा. मुख्याध्यापिका सौ.चौधरीबाई यांच्याकडे सुपूर्द केली. दत्तनगर प्राथमिक शाळेतील इ.५वी मधील गरजू व होतकरू विद्यार्थिनी कु.देवश्री महाडिक हिची शाळेने निवड केली .या रकमेचे वितरण सन्माननीय  श्री.कृष्णकांत रत्नकांत भानुशाली यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शाळेच्या सन्मा. मुख्याध्यापिका सौ.चौधरीबाई ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते .
 अशा सुजाण नागरिकांची समाजाला शिक्षणापासून  'वंचित' असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी  आवश्यकता आहे.