दीपअमावस्या

Source :    Date :13-Oct-2019
 
 
   '' दीपअमावस्या''
   ''दिव्या दिव्या दिपत्कार !  कानीकुंडले गळा मोतीहार !दिव्यास पाहून नमस्कार'' ! हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजापासून तू उत्तम तेज आहेस. माझ्या पुजेचा तु स्वीकार कर.
 आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.दि.२८/९/२०१९ रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक आमच्या शाळेत दीपअमावस्यासाजरी करण्यात आली.शाळेच्या सन्मा.मुख्याध्यापीका सौ.शैलजा चौधरीबाई यांनी कार्यक्रमाचे पूर्व नियोजन
केले होते.विद्यार्थी व शिक्षकांनीहि कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती.विद्यार्थ्यांनी विविध आकाराचे कलाकुसर केलेले
दिवे आणले होते.शाळेच्या हॉल मध्येफुलांच्या रांगोळीवर सुंदर अशी दिव्यांची आरस करण्यात आली होती.डोळ्यांचे पारणेफिटावे अशी सुंदर दिव्यांची रचना शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेली होती.
विद्यार्थ्यांना आपले विविध सण उत्सव भारतीय संस्कृती यांची माहिती व्हावी हा या मागचा उद्देश होता.