श्री कलासंस्कार आयोजित बालनाट्य स्पर्धेत दत्तनगर प्राथमिकच्या दोन बालनाटकांना पारितोषिक

Source :    Date :08-Oct-2019
सावित्रीबाई फुले नाट्यगृहात श्री कलासंस्कार आयोजित बालनाट्य स्पर्धेत दत्तनगर प्राथमिक शाळेच्या १ली ते ४ च्या विद्यार्थांनी सादर केलेल्या जादूचा दिवा रिटर्न्स या नाटकाला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
 
तसेच ५वी ते ७वी च्या विद्यार्थांनी जाणीव हे नाटक सादर केले.या नाटकाला उतेजनार्थ पारितोषिक मिळाले. कु.स्वरा वालावलकर इयत्ता ४ या विद्यार्थिनीला सर्वोकृष्ट बालकलाकाराचे बक्षीस मिळाले.
 
कु.देवश्री महाडिक या ५वी तील विद्यार्थिनीला विशेष लक्षवेधी बालकलाकार म्हणून बक्षीस मिळाले .सर्व शिक्षकांचे व सन्मा.मुख्याध्यापिका सौ.चौधरीबाई यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.