'''आनंदी पाखरे,हसली बालदिनी''

Source :    Date :15-Nov-2019
 
 
   
                     ''आनंदी पाखरे,हसली बालदिनी''
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपण ''बालदिन'' म्हणून दरवर्षी मोठ्या आंनदाने साजरा करतो.बालदिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेत इयत्ता १ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी ''वेशभूषा'' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.बालदिनाच्या शुभेच्छा देणारे सुरेख फलक लेखन  तसेच आनंद,उल्हास देणारी बालगीते यांमुळे बालदिनाला साजेशे वातावरण शाळेत निर्माण झाले होते.बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ.चौधरी बाईंनी पंडित नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार तसेच गुलाबाचे फुल अर्पण केले.आणि प्रतिमेचे पूजन करून सर्व  विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.यानंतर शाळेच्या भव्य प्रांगणात परिपाठ झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बालदिनाविषयी माहिती सांगण्यात आली.तसेच स्पर्धेसाठी कल्पक ,आकर्षक ,वेशभूषा केलेल्या बालगोपाळांनी व्यासपीठावर जाऊन आपल्या वेषभूषेसंदर्भात माहिती दिली.विजेत्या स्पर्धकांचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.