स्थानिक बँकेस भेट देणे /इयत्ता ६वी ७वी

Source :    Date :17-Nov-2019
                        संस्था स्तरीय उपक्रम
 
 स्थानिक बँकेस भेट देणे व बँकेच्या कामकाजाविषयी माहिती मिळविणे /इयत्ता ६वी ७वी
दि.१४.११.२०१९ रोजी बालदिनाचे औचित्य साधून शाळेच्या जवळ असलेल्या डोंबिवली नागरी सहकारी बँक (नांदिवली शाखा)भेट देण्याचे निश्चित केले.त्यानुसार ६वी व ७वीचे एकूण १०० विद्यार्थी व पालकप्रतिनिधी तसेच वर्गशिक्षिका सौ.मुणगेकर सौ.पाटील.उपस्थित होत्या.
 या उपक्रमाबाबत बँक व्यवस्थापक यांची अगोदर परवानगी घेतली होती.ठीक सकाळी ११:०० वाजता सर्व विद्यार्थ्यांना बँकेत नेण्यात आले.बँकेच्या मा.व्यवस्थापिका सौ.नलिनी गायकवाड व बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापिका सौ.अश्विनी जोशी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व बालदिनानिमित्त विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.नंतर बँकेचे सहव्यवस्थापक श्री.योगेश बेंडाळेसर व कु.अश्विनी काळे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना नागरी बँकेची सविस्तर माहिती दिली.
      बचतखाते चालूखाते विविधकर्ज धनयोजना सरळव्याज चक्रवाढव्याज व्याज सरळव्याज मुदतठेव कर्जयोजना विमायोजना डेबिटकार्ड क्रेडिटकार्ड चेकडिपॉझिट याविषयी माहिती दिली.व विद्यार्थ्यांना पालकांसोबत बँकेत गेल्यावर पावतीभरणे पैसेजमा करणे हि छोटी छोटी कामे करावीत असे सांगितले जेणेकरून विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाविषयी माहिती मिळेल.त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना काही प्रश्न विचारले,उदा,बँकेची वेळ कशी आहे,?बँकेत किती कर्मचारी आहेत,?
बँकेत कोणकोणते कर्ज उपलब्द आहे,?बँकेच्या किती शाखा आहेत.?बँकेत ऑनलाईन सेवा उपलब्द आहे का.?
                 या सर्वप्रश्नाची उत्तरे अतिशय व्यवस्थित बेंडाळे सरानी व कु.अश्विनी काळे मॅडम यांनी दिली. अखेरीस बँक कर्मचाऱ्यांनी  विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटले.सौ.मुणगेकर सौ.पाटीलबाईंनी मा.व्यवस्थापक सौ.गायकवाडमॅडम यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभारपत्र देऊन ऋणनिर्देश व्यक्त केले.