बुद्धी वापरू,विचार करू विज्ञानाची कास धरू.

Source :    Date :20-Nov-2019

 
                                       
                      शालेय विज्ञान प्रदर्शन 
         '' बुद्धी वापरू,विचार करू विज्ञानाची कास धरू.''
                विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड व जिज्ञासा निर्माण व्हावी.एखाद्या घटनेकडे वैज्ञानिक दृष्टीकोनाने बघण्याची वृत्ती निर्माण व्हावी या हेतूने दि.२० नोव्हेंबर २०१९रोजी आंतरराष्ट्रीय बालदिनाचे औचित्य साधून आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेत बालवैज्ञानिकांकरिता शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे प्रमुखपाहुणे मा.श्री विद्याधर शास्त्रीसर(शाळा समिती अध्यक्ष)यांच्याहस्ते स्वयंचलितपथदिवे या प्रकल्पाद्वारे उदघाटन करण्यात आले.विज्ञान प्रदर्शनात इयत्ता ३री ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक गटात ५० व सामूहिक गटात ४० प्रकल्पांची मांडणी केली होती.या प्रकल्पांचे परीक्षण स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर प्राथमिक शाळेच्या मा.मुख्याध्यपिका सौ.सरोजिनी महाजन व स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर प्राथमिक शाळेचे शिक्षक मा.श्री.मंगेश पेडामकरसर व विष्णूनगर प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थी यश चौधरी यांनी उत्तमप्रकारे परीक्षण करून गटनिहाय प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ प्रकल्पाची निवड केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.भावना राठोड यांनी केले.सदर कार्यक्रमास शालेयसमिती सदस्या मा.सौ.माधवी कुलकर्णीमॅडमही उपस्थित होत्या.
''डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका,''या विज्ञान गीताने प्रदर्शनाची वातावरण निर्मिती करण्यात आली.वैज्ञानिक दृष्टीकोन,चिकित्सक,व सर्जनशीलवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी विज्ञानाची गोडी लागावी तसेच राष्ट्रविकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन विज्ञानप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.सदर प्रदर्शनाचा उद्देश यशस्वीरित्या सफल झाला.
                         बक्षीसपात्र विद्यार्थी
वैयक्तिक गट:इयत्ता ३री ४थी
प्रथम क्रमांक:विषय:घाटरस्त्याचे अपघात टाळण्यासाठी उपाय (कु.सिद्धार्थ गणेश कुंभार)
द्वितीय क्रमांक:विषय:लिहिणारा रोबोट (कु.व्योम विक्रम साठे)
वैयक्तिक गट:इयत्ता ५वी ते ७वी
प्रथम क्रमांक:विषय:शेतीसाठी उपयोगी यंत्र (कु.राधिका डेंगळे )
द्वितीय क्रमांक:विषय:धूर शोषकयंत्र(कु.उर्वी गोडबोले)
तृतीय क्रमांक:विषय:दवाखान्यातील अलार्म (कु.सार्थक गाणार)
उत्तेजनार्थ क्रमांक:विषय:स्वयंचलित पथदिवे (सिमी म्हात्रे)
सामूहिक गट:इयत्ता ३री ४थी
प्रथमक्रमांक:विषय-कीटकनाशक(कु.दुर्वेशनेहते कु.ऋग्वेद कुलकर्णी)
द्वितीय क्रमांक:विषय-कार्बनडायऑक्साईड(कु.लावण्या बेंद्रे कु.हर्षदा वर्दम)
सामूहिक गट:इयत्ता:५वी ते ७वी
प्रथम क्रमांक:विषय:व्हॅक्युम क्लिनर कु.जीवन सकपाळ कु.हर्षल पावसकर:
द्वितीयक्रमांक:विषय:बटाट्यापासून वीजनिर्मिती कु.विश्वरी वाकडे कु.हर्षदा देवकर
उत्तेजनार्थक्रमांक:विषय:सौरऊर्जेपासून वीजनिर्मती कु.साहिल खेडेकर कु.राज मोढवे