स्थानिक समस्यांसंदर्भात नगरसेवकाची मुलाखत घेणे.

Source :    Date :10-Dec-2019


mulakhat_2  H x
             
              संस्थास्तरीय उपक्रम : इयत्ता ६वी
 
स्थानिक समस्यांसंदर्भात नगरसेवकाची मुलाखत घेणे.
वरील उपक्रमांतर्गत स्थानिक नगरसेवक मा.श्री.नितीन पाटील यांना दि.२१/११/२०१९ रोजी स्वामी विवेकांनद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेत आमंत्रित करण्यात आले.
स.ठीक ९.०० वाजता शाळेच्या सभागृहामध्ये मुलाखतीचा कार्यक्रम सुरु झाला.शाळेचे सह.शिक्षक श्री.पवार सरांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व प्रास्ताविक केले.तसेच सौ.मुणगेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री.नितीन पाटीलसर व दत्तनगर पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ.पवारबाई यांचे स्वागत शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.इयत्ता ६वीच्या विद्यार्थ्यांनी अगोदरच प्रत्येकी ५ प्रश्न काढून आणले होते.त्यातील २० प्रश्नांची निवड वर्गशिक्षिका सौ.मुणगेकर यांनी केली.कोणी कोणता प्रश्न विचारायचा हे देखील निश्चित झाले होते.इतर विद्यार्थ्यांनाही मुलाखतीचा अनुभव मिळावा यासाठी ५वी ते ७वीचे विद्यार्थी व पालकप्रतिनिधी यांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेतले.स्थानिक समस्यांना पूरक अशा प्रश्नांची निवड केली होती.विद्यार्थ्यांनी पुढे बेधडकपणे मा.नगरसेवकांना प्रश्न विचारले.
१)आपल्या परिसरातील गरीब व होतकरू मुलांसाठी आपण कोणता कार्यक्रम हाती घेणार आहात.?
२)परिसरातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी कोणती यंत्रणा राबवणार आहेत.?
३)डोंबिवलीतील रस्ते खड्डे मुक्त होण्यासाठी कोणती कार्यवाही करणार आहेत.?
४)आपण शाळेचे माजी विद्यार्थी आहात,आपल्या शाळेसाठी कशा प्रकारे भरीव सहकार्य करणार.?
५)स्मार्ट सिटी डोंबिवली करण्यासाठी आपले काय योगदान असणार आहे.?
 पाणी,स्वच्छता,आरोग्य,शासकीय योजना सुशोभिकरण,कचरा व्यवस्थापन,अशा वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले.मा.नगरसेवक नितीन पाटील यांनी प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक साध्या व सोप्या शब्दांत उत्तरे दिली.एवढेच नाही तर आपला मोबाईल नंबर देऊन आपल्या सूचना,तक्रारी,योजना शेअर करण्यासही सांगितल्या.अखेरीस श्री.पवारसरांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली श्री.राऊतसरांनी संपूर्ण मुलाखतीच्या कार्यक्रमाची क्षणचित्रे व व्हिडिओ चित्रीकरण केले.
मुलाखतीसाठी योग्य प्रश्नांची निवड करणे आणि ते बिनधोकपणे विचारणे ही एक कला आहे याचा प्रत्यय या मुलाखतीद्वारे सर्व विद्यार्थ्यांना आला.

mulakhat_1  H x
mulakhat_2  H x

mulakhat_3  H x
mulakhat_1  H x
mulakhat_3  H x
mulakhat_3  H x
mulakhat_2  H x