आंतरशालेय क्रीडा स्पर्धामध्ये स्वा.वि.वि.मंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली(पूर्व) शाळेतील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

Source :    Date :30-Dec-2019

sport_1  H x W:
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम!
ऐतेन न्यायेन अहमपि
शरीरसंवर्धनाय स्वारोग्याय प्रयत्न करोमि !
जगाच्या प्राचीनतम संस्कृतीमध्ये खेळांना विशेष महत्व देण्यात आले.सुरुवात जरी उदरनिर्वाहासाठी म्हणून झाली तरी कालांतराने खेळांना मनोरंजनाचे साधन म्हणून ओळख प्राप्त झाली.सहकार्याची भावना,खेळाडूवृत्ती,जिद्द,चिकाटी,शारीरिक त्रास सहन करण्याची ताकद,सांघिक भावना,या सर्वश्रेष्ठ गुणांनी सर्वच खेळ व्यापलेले आहेत.प्रत्यक्ष जीवनातील आशा निराशेचा खेळ आपल्याला विविध खेळातील यश अपयशातून दिसून येतो.निराश न होता जिद्दीने जीवनातील येणाऱ्या संकटात टिकून राहण्याचे मनोबल आपल्याला खेळातून प्राप्त होते भारतीय संस्कृतीचा मानबिंदू असलेला योग सुद्धा आज जगाच्या विविध देशांमध्ये मानाचे स्थान प्राप्त करून आहे.
सन:२०१९/२० या शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे १ली पासून इयत्ता १० पर्यंत विविध गटांमध्ये विविध प्रकारच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा दि.२६/१२/२०१९ ते २८/१२/२०१९ रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या त्यात सर्वच शाळांच्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभागी होऊन अक्षरशः बक्षिसांची लूट केली.स्पर्धा ह्या १ली ते २री /३री ते ४थी/५वी ते ७वी/८वी ते १०वी या चार गटात सांघिक व वैयक्तिक स्वरूपात घेण्यात आल्या. यावेळी दत्तनगर प्राथमिक व दत्तनगर माध्यमिक दोन्ही शाळांनी सर्वात जास्त गुण मिळवून पहिला फिरता चषक मिळविण्याचा मान मिळवला.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाखेतील बक्षिसपात्र विद्यार्थी 
१ली २री गट :वैयक्तिक स्पर्धा/२५ मीटर धावणे मुलगे /मुली
कु.मयुरेश माणिकराव जाधव/द्वितीय क्रमांक
कु.यश संजय लवंदे /तृतीय क्रमांक
कु.श्रृती प्रदीप गावडे /द्वितीय क्रमांक
कु.पवित्रा शिवाजी शिंदे/तृतीय क्रमांक
डंबेल्स उचलणे मुलगे/मुली
कु.मयुरेश माणिकराव जाधव/प्रथम क्रमांक
कु.यश संजय लवंदे/तृतीय क्रमांक
कु.पूनम नारायण घोडके/द्वितीय क्रमांक
कु.श्रृती प्रदीप गावडे/तृतीय क्रमांक
३री ते ४थी गट:वैयक्तिक स्पर्धा ५०मीटर धावणे मुलगे /मुली
कु.हर्षदा महेश वर्दम/प्रथम क्रमांक
कु.वेदांत महेश कोटकर/द्वितीय क्रमांक
कु.पार्थ विजय कदम/तृतीय क्रमांक
३री ते ४थी गट:पोते शर्यत
कु.हर्षदा महेश वर्दम/प्रथम क्रमांक
३री ते ४थी गट:लंगडी स्पर्धा
मुलगे संघ १० गुणांनी विजय
५वी ते ७वी गट:लंगडी स्पर्धा
मुलींचा संघ ९ गुणांनी विजयी
५वी ते ७वी गट:वैयक्तिक स्पर्धा/१०० मीटर धावणे/मुली
कु.दिया सुरेश पाटील/प्रथम क्रमांक
५वी ते ७वी गट:रिले १००x४ मी मुलगे/मुली दोन्ही गटास/तृतीय क्रमांक
 
sport_4  H x W:
 

sport_3  H x W: 
sport_2  H x W:
sport_1  H x W:
 
 
sport_4  H x W:
sport_3  H x W:
sport_2  H x W:
sport_1  H x W:
 
 
sport_2  H x W:
sport_1  H x W:
 
sport_1  H x W: