स्वा.वि.वि.दत्तनगर प्राथ.डोंबिवली पूर्व शाळेने साजरी केली online महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती.

Source :    Date :10-Oct-2020
 
gandhi jayanti_1 &nb
 
      स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली
दिनांक 2 ऑक्टोबर 2020
 महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त ऑनलाईन चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा.
''स्वतःला शोधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतःला इतरांच्या सेवेत झोकून देणे''( महात्मा गांधी)
''जय जवान जय किसान ''(लाल बहादूर शास्त्री)
      राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्यांना आपण प्रेमाने बापू म्हणतो,हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते होते.लालबहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते.सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरून 150 वर्षाच्या पारतंत्र्यानंतर देशाला स्वातंत्र्य देणारे हे केवळ नेतेच नव्हे तर एक सद्गुण कर्मयोगी आणि खरे युगपुरुष होते.साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणाऱ्या या दोन महंतांची जयंती 2 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते.
          शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी यांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्याचे सुचित केले.सध्याच्या काळात शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे.म्हणून हा उपक्रमही ऑनलाइन घेण्याचे ठरले.सर्व शिक्षकांनी आपापल्या वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुप वर स्पर्धेविषयी सूचना दिल्या.Covid19 रोगाचा वाढता प्रादुर्भाव या विषयावर जनजागृती आणि स्वच्छता विषयक संदेश या पार्श्वभूमीवर चित्रकलेचे विषय निवडण्यात आले.
चित्रकलेचे विषय पुढील प्रमाणे:
1.Post Covid smart city,
2.Covid warrior,
3.Safe streets,
4.Smart city,
5.Woman safety.
          इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.आपल्या कल्पना शक्तीप्रमाणे प्रत्येकाने सुंदर चित्र काढून सहभाग घेतला.सुंदर सुंदर चित्रांचे फोटो शिक्षकांना पाठवले,वर्गनिहाय उत्कृष्ट चित्रांचे क्रमांक काढण्यात आले.
महात्मा गांधी जयंती निमित्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्वच्छतेची शपथ देण्यात आली.तसेच आपले घर आणि आपला परिसर स्वच्छ करण्याबाबत मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.त्याप्रमाणे पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आनंदाने प्रत्यक्ष स्वच्छता कार्यात सहभाग घेतला.परिसर स्वच्छता करताना विद्यार्थ्यांनी फोटो काढून शिक्षकांना पाठवले.
माननीय श्री लाल बहादुर शास्त्री जयंतीनिमित्त पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.हस्ताक्षर स्पर्धेकरिता शिक्षकांनी आपल्या ग्रुप वर शास्त्रीजींच्या जीवनचरित्रातील त्यांचे कार्य आणि गुण याविषयी माहिती असणारा परिच्छेद विद्यार्थ्यांना दिला.सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
             महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमापूजन केले.त्यांची आदर्श विचारसरणी आणि जगण्याचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे देण्यात आला. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम घेण्यात आला.सदर उपक्रमास मा.शाळा समिती अध्यक्ष आणि मा.सदस्य यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 
 
 
gandhi jayanti_4 &nb

gandhi jayanti_2 &nb
 
 
gandhi jayanti_1 &nb
gandhi jayanti_1 &nb
gandhi jayanti_4 &nb
gandhi jayanti_3 &nb
gandhi jayanti_2 &nb
gandhi jayanti_1 &nb
gandhi jayanti_5 &nb
gandhi jayanti_4 &nb
gandhi jayanti_3 &nb
gandhi jayanti_2 &nb
gandhi jayanti_1 &nb
gandhi jayanti_5 &nb
gandhi jayanti_4 &nb
gandhi jayanti_3 &nb
gandhi jayanti_2 &nb
gandhi jayanti_1 &nb
gandhi jayanti_3 &nb
gandhi jayanti_2 &nb
gandhi jayanti_1 &nb
 
 
gandhi jayanti_3 &nb