स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,दत्तनगर (प्राथ.)शाळेत साजरी करण्यात आली ऑनलाईन आषाढ अमावस्या

Source :    Date :21-Jul-2020
ऑनलाईन  दीप पूजन 
                                      
 दीप पूजन_1  H x 
राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित,
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,दत्तनगर (प्राथ.)
शाळेत साजरी करण्यात आली
ऑनलाईन आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ वर्षात कोरोंना महामारीमुळे शाळा बंद असल्या तरीही दत्तनगर प्राथमिक या शाळेने सोमवार दि. २० जुलै २०२० रोजी शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी बाई यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता १ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी साजरी केली '' ऑनलाईन दीप अमावस्या ".
      विद्यार्थ्यांनी घरी रांगोळ्या काढून ,फुलांची सजावट करून वेशभूषा करून दिव्यांची आरास केली व दीप पूजन केले. विद्यार्थ्यांनी  ' शुभम करोति कल्याणम ' म्हणून दीपपूजन केले.
      काही विद्यार्थ्यांनी आषाढ अमावस्याची माहिती सांगितली व सर्व फोटो व्हिडिओ आपापल्या वर्गशिक्षकांना पाठवले. त्या सर्व फोटोंचे एकत्रीकरण व्हिडिओच्या माध्यमात शाळेचे शिक्षक सौ .भावना राठोड बाई यांनी इयत्ता पहिली ते चौथी व श्री.एकनाथ पवार सर यांनी इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांचे फोटोंचे एकत्रीकरण केले.
     शाळा समिती अध्यक्ष सन्मा.श्री. शास्त्री सर ,शाळा समिती सदस्य सन्मा. श्री. इनामदार सर व सन्मा.सौ.कुलकर्णी बाई यांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले .
       "शाळा बंद पण उपक्रम सुरू" याअंतर्गत राबवण्यात आलेल्या ह्या  ऑनलाईन उपक्रमाचे सर्वांतर्फे खूप कौतुक करण्यात आले.
     शाळेच्या सन्मा. मुख्याध्यापिका सौ. शैलजा चौधरी बाई यांनी पालक, विद्यार्थी  व शिक्षकांचे अभिनंदन केले व सर्वांना दीप अमावास्येच्या शुभेच्छा दिल्या..
             
दीप ज्योती: परब्रम्हा
दीपज्योतीजनार्दन:|