स्वा.वि.वि.दत्तनगर.प्राथ.डोंबिवली पूर्व शाळेने आयोजित केला 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त एक अनोखा ऑनलाईन 74वा ध्वजारोहण सोहळा

Source :    Date :17-Aug-2020
 
                                                             swatantr din_1  
                                                                                             राष्ट्रीय शिक्षण संस्था,
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,दत्तनगर (प्राथमिक)
                                                                                 " गाऊनी देशभक्तीचे गाणं
          वाढवू स्वातंत्र्यदिनाची शान!"
          दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश साम्राज्यापासून भारताला स्वातंत्र मिळाले. त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस 'भारतीय स्वातंत्र्य दिन 'म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.स्वातंत्र्य दिन'प्रामुख्याने देशाच्या राजकीय दिवसास संबोधले जाते .कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्य दिन म्हणजे एक गौरवाचा दिवस असतो.
          ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते. भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहणाचा प्रमुख कार्यक्रम हा लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. सन्माननीय पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते.त्याच प्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. देशभर हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून अमाप उत्साहात साजरा केला जातो.
         आमच्या शाळेतही दरवर्षी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले जाते. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात येते . विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिना बाबत माहिती देण्यात येते.
       यावर्षी कोरोना महामारीच्या सावटा खाली 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमच्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वैयक्तिक देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली.सहकारी शिक्षकांच्या मदतीने स्पर्धांचे नियोजन करण्यात आले.
स्पर्धेसाठी पुढील गीतांची निवड करण्यात आली.
इयत्ता -पहिली: बालवीर मी - - - -
इयत्ता- दुसरी:देश मेरे - - -- -
इयत्ता- तिसरी,चौथी :आवडते देशभक्तीपर गीत
इयत्ता- पाचवी:विजयी विश्व तिरंगा
इयत्ता- सहावी:बलसागर भारत होवो !
             इयत्ता सातवी - सारे जहाँ से - - - -
       तसेच इ-5वी अथर्व मयेकर याने स्वातंत्र्यदिनाविषयी,इ-6वी सेजल वारंग हिने आपला स्वातंत्र्यदिन आणि आपण व इ-7वी साक्षी सुतार हिने आपला राष्ट्रध्वज या विषयी माहिती सांगितली.
    सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला .तसेच पालकांनी संगीताची साथ दिली .विद्यार्थ्यांनी आपल्या घरूनच देशभक्तीपर गीत गाऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला .विद्यार्थ्यांनी सदर गाण्याची व माहितीची व्हिडीओ क्लिप व्हाट्सअँप च्या माध्यमातून वर्ग शिक्षकांना पाठविल्या. त्यांनी प्रत्येक वर्गातील उत्कृष्ट गाण्याची निवड केली.या गाण्यांचे एकत्रीकरण इयत्ता:१ली ते ४थीचे-श्री मयूर राऊत सर यांनी केले.व ५वीते७वी च्या चित्रफितींचे एकत्रिकरण श्री.एकनाथ पवारसर यांनी केले.सन्माननीय मुख्याध्यापिका यांचे मार्गदर्शन, सर्व शिक्षकांचे परिश्रम, पालकांचे सहकार्य व विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभाग यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.
     शाळा समिती अध्यक्ष सन्माननीय श्री.शास्त्रीसर सन्माननीय सदस्य श्री.इनामदारसर सन्माननीय सदस्य डॉ.श्री.प्रकाश करमरकरसर आणि शाळा समिती सदस्या सन्माननीय सौ.कुलकर्णीबाई यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले व स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.