स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथ.डोंबिवली पूर्व.शाळेत ९ऑगस्ट रोजी क्रांतिदिन आणि जागतिक आदिवासी दिन आभासी प्रणालीद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.

Source :    Date :11-Aug-2021
krantidin_1  H
 
                                                                             राष्ट्रीय शिक्षण संस्था
       स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथ.डोंबिवली पूर्व शाळेत ९ऑगस्ट रोजी क्रांतिदिन आणि जागतिक आदिवासी दिन आभासी प्रणालीद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.
 
              इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे 9ऑगस्ट अर्थात क्रांतीदिन देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस.सन 1942 ला अखेरचा लढा देण्याचे महात्मा गांधीजींनी ठरवले.8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतल्या गोवालिया टँक,अर्थात ऑगस्ट क्रांती मैदान येथे झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात गांधीजींनी ब्रिटिश सरकारला इशारा दिला.'करेंगे या मरेंगे'हा मंत्र 9 ऑगस्ट या दिवशी संपूर्ण देशात पसरला.त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योत जणू पेटली होती. गांधीजींसह सर्व नेत्यांना अटक झाली होती.गांधीजींनी जनतेला संदेश दिला आता प्रत्येक जण पुढारी होईल.नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले सारा.देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत होता.9ऑगस्ट क्रांती दिनी.प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीरांना शतशःनमन करून त्यांचे पुण्यस्मरण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हा दिवस अर्थातच क्रांतिदिन!.नऊ ऑगस्ट हा ज्याप्रमाणे क्रांतीदिन म्हणून आपल्या सर्वांच्या चिरकाल स्मरणात राहतो.
                   त्याच प्रमाणे संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने दरवर्षी 9 ऑगस्ट विश्व मूलनिवासी दिन म्हणून साजरा केला जातो.आपल्या देशातही हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा होतो.स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या क्रांतिकारकांची संख्या देखील फार मोठी आहे.आपल्या धर्म,संस्कृतीवर होणारे परकीयांचे आक्रमण थोपवण्यासाठी तर काहींनी शोषणाविरुद्ध विषमतेविरुद्ध लढे उभारले.ब्रिटिशांना सर्वप्रथम येथील आदिवासींशी लढा द्यावा.लागला हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागात इंग्रजांविरुद्ध झालेल्या लढ्यात भारतातील रामजी भांगरा,बुधा भगत,रामा किरवा,राघोजी भांगरे,नाग्या कातकरी,राणी दुर्गावती,बिरसा मुंडा,झलकारीबाई या आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे आहे.आदिवासी संस्कृतीची ओळख नागरी भागातील लोकांना होणे सहज शक्य नसते.                                         महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील तसेच पालघर,तलासरी,जव्हार,मोखाडा,शहापूर,मुरबाड,
वाडा,भिवंडी या तालुक्यातील आदिवासी पाड्यातील कातकरी,वारली,ठाकर,कोकणा,मल्हार,कोळी या जमाती आदिम काळापासून तेथे राहात आहेत.त्यांची विशिष्ट जीवनशैली,त्यांचे संगीत,त्यांची नृत्य त्यांचे,शृंगारप्रसाधने,देव-देवतांच्या मूर्ती घरगुती उपयोगाच्या वस्तू,शिकारीची आयुधे हत्यारे व त्यांची वैशिष्ट्यपूर्ण चित्रकला यांचा समावेश होतो.आदिवासींचा आत्मसन्मान जागवण्यासाठी त्यांची अस्मिता जागृत करण्यासाठी त्यांनी एकसंघ होण्यासाठी जागतिक आदिवासी दिवस महत्त्वपूर्ण ठरतो.
                                आदिवासी लोकांच्या संस्कृतीची ओळख शहरी भागातील लोकांना व्हावी म्हणून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथ.शाळेत देखील ऑनलाइन स्वरूपात आदिवासी दिन साजरा करण्यात आला.9ऑगस्टक्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत आभासी प्रणालीच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याअंतर्गत इ.१ली व २रीच्या विद्यार्थ्यांनी क्रांतीकारकांच्या वेशभूषा करणे.इ.3री ते ७वीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी चित्रकला वारली चित्र काढणे.अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.9ऑगस्ट क्रांतीदिन प्राणांचे बलिदान करणाऱ्या क्रांतीकारकांची माहिती कु.अर्णव प्रदीप पाटील इ.३री इ.६वीतील कु.समीक्षा बळीराम पारधी या विद्यार्थ्यांनी क्रांतीदिनाची माहिती सांगितली. तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने कु.कैवल्या मनोज म्हात्रे इ.४थी कुणाल सुरेश मोढवे इ.६वी शिवम मनोहर खंडागळे इ.७वी या विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतिकारकांविषयी माहिती सांगितली.तसेच आदिवासी कलेचा वारसा जपत कुमारी सौम्या शैलेश पड्याळ या 3री मधील विद्यार्थिनीने सुंदर झुंबर तयार केले.तसेच कुमार आयुष गायकवाड इयत्ता तिसरी या विद्यार्थ्याने क्रांती दिनानिमित्त हुतात्मा गीत सादर केले.इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑगस्टक्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने उपक्रमाचे आयोजन शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ.गितांजली मुणगेकर बाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षकांचे उत्तम नियोजन व मार्गदर्शन पालक व विद्यार्थ्यांची मेहनत,उत्साह यामधूनच उपक्रम साकारला गेला.शालेय समितीच्या सन्माननीय अध्यक्षा तसेच शालेय समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.अशा प्रकारे 9ऑगस्ट क्रांतीदिन व जागतिक आदिवासीदिन मोठ्या उत्साहात आभासी प्रणालीच्या माध्यमातून साजरा झाला.
 
 
 
 
 
 


krantidin_2  H
krantidin_1  H
krantidin_6  H
krantidin_5  H
krantidin_4  H
krantidin_1  H



krantidin_6  H
krantidin_7  H
krantidin_2  H
krantidin_3  H

krantidin_5  H
krantidin_3  H
krantidin_1  H  
 

krantidin_2  H
krantidin_1  H  
 

krantidin_8  H  
 

krantidin_4  H