चला साजरा करूया "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"

Source :    Date :17-Aug-2021
                                                चला साजरा करूया "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"
 
 
 
                                                  independance day_1 &
 
 
               राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, गणेशपथ व गोपाळनगर (प्राथमिक) इयत्ता १ ली  ते ७ वि च्या विद्यार्थ्यांनी चित्रांद्वारे व देशभक्तीपर गीत गायनाने व्यक्त केल्या आपल्या देशभावना .
 
          स्वातंत्र्य हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक भारतीयांचा नसांमध्ये रक्तासारखा संचार करत असतो. स्वतंत्रता हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुलसीदासजी म्हणतात 'पराधीन सपनेहुं सुखनाहीं' म्हणजे गुलामगिरीमध्ये तर स्वप्नात देखील सुख नसतं. गुलामगिरी तर कोणासाठीही अभिशाप आहे. ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा ही नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते.आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि पूर्ण जगभरात    भारताची एक स्वतंत्र ओळख आहे. टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनीन जी कामगिरी केलेली आहे त्यामुळे या वर्षाच्या स्वातंत्रदिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे .आपले संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. यामध्ये सर्व देशवासीयांना समानतेचा अधिकार आहे. आपचा राष्ट्रीय झेंडा देखील प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे.
 
             आपल्या भारताचे आदरणीय पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदींनी  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले व  जनतेला स्वातंत्र्याचे महत्व व आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी केलेल्या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे त्यांची जाणीव जनमानसात निर्माण करून दिली.आज संपूर्ण जगात भारत आशेचा किरण बनून सूर्यासम आकाशात चमकत आहे, हे सर्व स्वतंत्र्य भारतात शक्य आहे. पण आम्हाला हे स्वातंत्र्य सहजच मिळाले नाही, या साठी देशातील शूरवीर आणि स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले आहे. आम्हाला त्याचे नेहमीच आभार मानायला हवे.
खरं तर हे आपले सौभाग्याचं आहे की आपण या भारताच्या पवित्र भूमीवर जन्मलो आणि स्वातंत्र्याच्या सुंदर वातावरणात श्वास घेतला. देशप्रेम एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकांमध्ये असणं आवश्यक आहे. या देशप्रेमाचे संस्कार बाळकडू लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे म्हणूनच गणेशपथ व गोपाळनगर (प्राथमिक ) शाळांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली ते सातवी  विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमांद्वारे  देशसवेचे संस्कार देण्याचा प्रयत्न केला गेला
.
                                                  १)इयत्ता १ ली व २ री साठी झेंड्याचे चित्र काढून रंगवणे.
 
                                          २) इयत्ता ३ री व ४ थी साठी देशभक्तीपर कविता किंवा गीताचे गायन .
 
                                                     ३)इयत्ता ५ वी ते ७ वी साठी देशभक्तीपर गीताचे गायन
 
         या स्पर्धा घेण्यात आल्या. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व आयोजन गणेशपथ शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सुदेष्णा मुरलीधर महाकाळ यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी वर्ग शिक्षकांकडे व्हाट्सअप च्या माध्यमातून  व्हिडिओ व फोटो पाठवले व त्यांचे एकत्रीकरण करून व्हिडिओ तयार करण्यात आला.त्याव्दारे सर्व विद्यार्थ्यांना खालील संदेश देण्यात आला
 
          "आपल्याला भारतवर्षाला पूर्वी सारखे सुवर्ण पक्ष्यासारखे बनवायचे आहे. आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजायचा आहे,  आपल्या अधिकारांपेक्षा आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवं, तरच आपला देश संपूर्ण जगात एक महासत्ता म्हणून समोर येईल. हेच आमचे उद्दिष्ट आहे". या उपक्रमासाठी सहकार्य करणारे विद्यार्थी पालक यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
 
                                        भारत मातेचा विजय असो, आपण सर्व एक आहोत 'वंदे मातरम् !!'