शाळेत रंगला चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव

Source :    Date :18-Oct-2019
शाळेत रंगला चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव
 


      शनिवार दिनांक १५/०६/२०१९ रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गणेशपथ शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. चिमुकल्या पावलांच्या आवाजाने ,खेळण्याने बहरून उठले हे ज्ञानमंदिर .शाळेचे जणू रूप पालटले या चिमुकल्यांच्या येण्याने अबॊल भिंती हि बोलक्या झाल्या . शाळेचा परिसर गजबजून गेला. शाळेला हार ,तोरणे,फुले लावून रांगोळी काढून शाळा सजवण्यात आली. शाळा समितीच्या सौ. सावंत बाई हस्ते विद्यार्थ्यांना पेन्सिल. पेन. रबर,चॉकलेट आणि मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शैलजा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.