राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळ नगर व गणेशपथ प्राथमिक च्या विद्यार्थ्यांनी चित्रांद्वारे व्यक्त केल्या त्यांच्या भावना.

Source :    Date :13-Jun-2021

जागतिक बालकामगार विरोधी दिन

                                  the day against child lab                                                              

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर व गणेशपथ प्राथमिक च्या विद्यार्थ्यांनी चित्रांद्वारे व्यक्त केल्या त्यांच्या भावना.

    बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा... असे आपण नेहमी म्हणतो. कारण बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो. ना कसली चिंता ना कसली काळजी, मनसोक्त खेळा, हसा, आनंद लुटा... पण असा हा सुखाचा काळ काही मुलांच्या नशिबात नसतो. कारण जेव्हा आपण घराबाहेर पडून समाजात वावरतो तेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी सिग्नलजवळ काही वस्तू विकणारी मुले, हॉटेल, बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर पाणी वाटणारी, टेबल साफ करणारी मुले पाहतो. अशा मुलांना कुठे सुखाचे बालपण अनुभवायला मिळते? बालकामगार विरोधी कायदा असूनही त्यांचे बालपण हरवत चालले आहे. 

    शनिवार १२ जून २०२१  बालकामगार विरोधी दिन यानिमित्ताने 'कॅम्लीन' तर्फे चित्रकला स्पर्धेचेशालेय स्तराव आयोजन करण्यात आले होते . राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर गोपाळ नगर प्राथमिक व गणेशपथ
प्राथमिक च्या विद्यार्थ्यांनी ह्या विषयावर आधारित चित्र रेखाटले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ' इ- प्रमाणपत्र' देण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभाग घेतला  व बालकामगारां विषयी त्यांच्या भावना त्यांनी चित्राद्वारे व्यक्त केल्या .या सर्व चित्रांचे संकलन इयत्ता [ १ ली ते ४ थी ] शिक्षिका-सौ.कल्पना कांबळे व 
सौ .सरोजिनी महाजन  यांनी केले. ह्या स्पर्धेची संपूर्ण आयोजन , चित्रांचे व विद्यार्थ्यांच्या ' इ- प्रमाणपत्रांचे'  व्हिडिओ च्या माध्यमाने     सं
कलन गोपाळ नगर (प्राथमिक) शाखेच्या प्रभारी मुख्याध्यापिका  सौ.भावना राठोड यांनी केले .
     
     कोरोना च्या काळात शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण मात्र कुठेही थांबलेले नाही त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन माध्यमाच्या साह्याने हया उपक्रमांमध्ये सहभागी झाले व  त्यांच्यातील सुप्त कलागुणांची  चुणूक दाखवली त्याबद्दल विद्यार्थ्यांचे  कौतुक व पालकांच्या सहकार्याबद्दल शाळेतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार . 
 
 
 
ReplyForward