विठ्ठल नामाची शाळा भरली"राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, गोपाळनगर व गणेशपथ (प्राथमिक) इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन "विठ्ठलनामाची वारी"

Source :    Date :21-Jul-2021

                                 "विठ्ठल नामाची शाळा भरली"


dindi_1  H x W: 

             राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, गोपाळनगर व गणेशपथ  (प्राथमिक) इयत्ता पहिली ते चौथीच्या       विद्यार्थ्यांचीऑनलाइन "विठ्ठलनामाची वारी

      मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पआषाढ महिन्यातील (जून-जुलै) शुक्ल शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही प्रथमा एकादशी  देव-शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. हा मोठा पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास केला जातो. या दिवसापासून चतुङ्र्कास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्रेस जातात आणि योगनिद्रेतून बाहेर येतात पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बाधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स. 83 मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. 516 मध्ये राष्ट्रकुटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. 1239 च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. 1296 मध्ये चालू झाली; तर इ.स. 1650 मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणार्‍या पालखीची प्रथा पाडली.
 
      एकादशी म्हणजेच 'आषाढी एकादशी'. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक वेगळेच स्थान आणि महत्त्व आहे. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. एक महिना आधीपासूनच याची तयारी सुरू होते. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात. याचा सोहळा अगदी डोळे दिपवून टाकतो. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. त्यामुळेच याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो असं म्हटले जाते. . ईश्वर हा चराचरात आहे ही भावना अधिक बळावते. तसंच पूर्वी एकमेकांची भेट घेऊन आपापले अनुभव, कथा, रचना, अभंग आणि भजने कार्तिकी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी या साधनेचा  एकमेकांकडे अनुभव देण्यासाठी आणि पुढील पिढीला  जाणीव व्हावी या हेतूने केला जातो .
 
      कोरोनाच्या पार्श्वभूमी मध्ये 'शाळा बंद पण शिक्षण सुरू' या अंतर्गत यावर्षी मंगळवार दिनांक  २० जुलै रोजी आषाढी एकादशी च्या निमित्ताने इयत्ता १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन 'वेशभूषा' त्यात वारकरी, संत यांच्या प्रामुख्याने वेशभूषा करून या उपक्रमाला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिला. या उपक्रमाचे संपूर्ण आयोजन व नियोजन गणेशपथ शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका सौ.कल्पना कांबळे यांनी केले त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित सूचना सांगून २० जुलै २०२१ रोजी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला आषाढी एकादशीच्या या ऑनलाईन वारीत सर्व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून खूप छान छान फोटो वर्ग शिक्षकांकडे पाठविले या सर्व व्हिडिओचे संकलन शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. कल्पना कांबळे यांनी केले पालकांनी विद्यार्थ्यांना छान वेशभूषा करून दिली. त्याबद्दल सर्व पालकांचे शाळेच्या वतीने आभार.