राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर गोपाळनगर व गणेशपथ प्राथमिकच्या इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी साजरी केली ऑनलाइन गुरुपौर्णिमा

Source :    Date :25-Jul-2021
               गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
 
ss_1  H x W: 0
 
       राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर गोपाळनगर व गणेशपथ प्राथमिकच्या इयत्ता १ ली ते ४ थी च्या  विद्यार्थ्यांनी साजरी केली ऑनलाइन गुरुपौर्णिमा
 
    गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. ह्या दिवशी शाळेत, मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चालायला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका व जीवनात उतू नये मातू नये  असा संदेश देणारी चराचर सृष्टी महणजे 'निसर्ग' हे सर्वच आपले गुरु.
 
           अनेक व्यक्तीमत्वांमधून  गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो. गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
खरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध,जी शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्य ही आहे. ह्या दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत. गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत. उदा :महर्षी व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी,अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य-द्रोणाचार्य, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व एकनाथ आधुनिक गुरू-शिष्यां मध्ये सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणं आहेत
.
         हिंदु धर्मांत महर्षी व्यास आदय गुरु समजले जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते अशी मान्यता आहे. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. त्यामुळेच गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे. कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले की, 'ग' कार म्हणजे सिद्ध होय. 'र' कार म्हणजे पापाचे दहन करणारा. 'उ' कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप.गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतात.
 
           सध्या करोनामुळे "शाळा बंद पण शिक्षण सुरू " या अंतर्गत आमच्या शाळेच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी  गणेशपथ शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सन्मा. सौ.सुदेष्णा महाकाळ व गोपाळनगर शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मान.सौ. भावना राठोड यांच्या मार्गदर्शनाने इयत्ता २ ली  ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते .यात इयत्ता पहिली दुसरी च्या विद्यार्थ्यांना श्लोक गायन व  इयत्ता तिसरी चौथी च्या विद्यार्थ्यांना गुरु शिष्य यांच्या कथा सांगणे हा ऑनलाइन उपक्रम घेण्यात आला.गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वप्रथम ऑनलाइन महर्षी व्यासांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन  करण्यात आले . इयत्ता पहिली दुसरी च्या विद्यार्थ्यांनी  गणेशप शाळेचा साहा.शिक्षिका सौ. सविता बहाळकर यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार श्लोकांचे गायन केले व तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्यांच्या कथा सांगितल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन  गणेशपथ (प्राथमिक) शाळेच्या सहकारी शिक्षिका सौ.सविता बहाळकर यांनी केले.
 
       कोरोनाच्या या कठीण काळातही अनेक मार्गदर्शक आपल्याला लाभले ज्यामुळे या काळात आपल्याला धीर मिळाला, प्रसंगावधान राखत वाईट परिस्थितीत अनेक जण योग्य दिशा दर्शक ठरले या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
 
         सर्व पालकांना व  विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीवर मात करून कोरोना  नियमांचे पालन करण्याचे शाळे तर्फे आवाहन करण्यात आले सर्व पालकांनी आपल्या पाल्याची वेशभूषा करून खूप छान तयारी करून घेतली त्याबद्दल शाळेतर्फे  सर्वांचे आभार.