राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,गोपाळनगर व गणेशपथ (प्राथ.) इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची लोकमान्य टिळकांच्यापुण्यतिथीनिमित्तआदरांजली.

Source :    Date :02-Aug-2021
              "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ’’
 
lkk_1  H x W: 0
राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,गोपाळनगर व गणेशपथ (प्राथ.) इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची लोकमान्य टिळकांच्यापुण्यतिथीनिमित्तआदरांजली.
 
        "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ’’ अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणुन ख्यातनाम आहेत.बाळ गंगाधर टिळक भारतिय क्रांतीकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकिल व भारतीय स्वातंत्र्य सेनानी देखील होते
.
      बाळ गंगाधर टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ साली रत्नागिरीत एका चित्पावन ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे मुळगांव कोकणातील चिखली हे होते. टिळकांचे वडिल एका शाळेत शिक्षक म्हणुन कार्यरत होते व संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक व ज्ञानी होते. टिळक अवघे १६ वर्षांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
१८७७ साली पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातुन त्यांनी पदवी मिळवली. फार नगण्य लोक त्या काळी महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत होते, लोकमान्य टिळक त्यातुन एक होते ज्यांनी महाविद्यालयीन पदवी प्राप्त केलीएका खाजगी शाळेत टिळकांनी गणित शिक्षक म्हणुन कार्य सुरू केले. पुढे पत्रकार म्हणुन कार्यकर्ते झाले. पत्रकार म्हणुन कार्य करत असतांना सगळयाच सामाजिक चळवळींमधे ते सहभागी होते.
 
      महाविद्यालयातील मित्र महादेव बल्लाळ नामजोशी, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळुणकर यांच्यासमवेत टिळकांनी  पुण्यात डेक्कन एज्युकेशन ची स्थापना केली.भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन १८८१ मध्ये, लोकमान्य टिळकांनी ‘भारतीय जनता आणि लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि जनतेने स्वत: च्या भावना आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा द्यावा’ या उद्देशाने ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या दोन मासिकांची सुरूवात केली. ही दोन्ही वर्तमानपत्र लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली
.
       जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेचा लोकमान्य टिळक यांच्यावर खोलवर परिणाम झाला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती खालावू लागली आणि नंतर ते मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त झाले, ज्याने त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली.त्यानंतर लोकमान्य टिळकांनी १ऑगस्ट १९२० रोजी अखेरचा श्वास घेतला, त्यांच्या मृत्यूमुळे देशभरात तीव्र शोककळा पसरली, लाखो लोक त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये जमले.
 
       लोकमान्य टिळक म्हणायचे ’’ धार्मिक आणि वास्तविक जीवन वेगळे नाही. फक्त संन्यास घेणे हा जीवनाचा मुख्य हेतु नसावा, जीवनाचा खरा आनंद देशाला घर समजुन त्याकरता कार्य करणे हा आहे". प्रथम आपण मानवतेची पुजा करण्यास शिकायला हवे तेव्हांच परमेश्वराची पुजा करण्यालायक बनू शकू. लोकमान्य टिळकांची हीच शिकवण त्यांचे कार्य विद्यार्थ्यांना समजावेत त्यांच्यावर देशसेवेचे संस्कार व्हावेत या हेतूने राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर  गोपाळनगर व गणेशपथ ( प्राथमिक) शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त उतारा लेखन ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे मार्गदर्शन शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ सुदेष्णा महाकाळ व  सौ. भावना राठोड यांनी केले. उताऱ्यांचे संकलन शाळेच्या सहकारी शिक्षिका सौ. अंकिता खैरनार यांनी केले. विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांविषयी चे आपले विचार सुंदर सुवाच्च अक्षरात मांडले व वर्ग शिक्षकांकडे पाठवले
 
.                 करोनाच्या पार्श्वभूमी "शाळा बंद पण शिक्षण सुरू" या अंतर्गत कुठेही विद्यार्थ्यांच्या उपक्रमात खंड पडू नये म्हणून अशा प्रकारचे विविध उपक्रम शाळेकडून राबवले जातात या उपक्रमांना पालकांचे देखील उस्फूर्त सहकार्य मिळते पालक आपल्या पाल्यांना कडून तयारी करून घेतात त्याबद्दल शाळेतर्फे सर्व पालकांचे खूप खूप आभार.