राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर व गणेशपथ (प्राथमिक) इयत्ता १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त स्वतः तयार केलेल्या राख्या.

Source :    Date :26-Aug-2021
                              "श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे ,भाऊ माझा यशाने न्हाऊ दे.."
 
 
                                      rakshabandhan_1 &nbs
 
  राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर व गणेशपथ (प्राथमिक) इयत्ता १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त स्वतः तयार केलेल्या राख्या. 
 
          हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी साजरी करतात. याच दिवसाला 'रक्षाबंधन' म्हणतात.बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा हा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस 'पवित्रारोपण' असेही म्हणतात.
 
         भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा आपल्या भावाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. याच पवित्र हेतूने राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,गोपाळनगर व गणेशपथ (प्राथमिक) शाळेच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी 'राखी तयार करणे' हा उपक्रम घेण्यात आला तशा सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.
 
         विद्यार्थ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून अतिशय सुंदर सुंदर राख्या तयार केल्या व त्याचे फोटो व्हाॅट्सअप च्या माध्यमातून वर्ग शिक्षकांकडे पाठवले त्या सर्व फोटोचे एकत्रीकरण व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यात आले. विद्यार्थिनींनी आपल्या कल्पनेने तयार केलेल्या राख्या आपल्या भावाच्या हातात बांधल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद  मिळाला.
 
पालकांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले त्याबद्दल गोपाळनगर (प्राथमिक) शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. भावना प्रकाश राठोड व गणेशपथ (प्राथमिक)शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुदेष्णा महाकाळ यांनी शाळेतर्फे सर्व पालकांची  आभार मानले .