दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥दीपपूजन सन ८ ऑगस्ट२०२१-२२

Source :    Date :09-Aug-2021
                       दीपपूजन सन  ८ ऑगस्ट२०२१-२२
 
               "दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥"
 
              deep amavasya 1_1 &n
 
       राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर गोपाळनगर व  गणेशपथ (प्राथ.) इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी  केले दीपपूजन
 
     आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या  अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा "दीप अमावस्या "असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरु होण्या आधीच पूजा करण्याचा हा सण आहे.दीप अमवास्येच्या दिवशी भगवान शंकर, पार्वती, आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. या दिवशी  पिंपळ, केळी, लिंबू किंवा तुळशीची रोपटी लावली जातात.
 
.‘‘हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस". अशी मनोभावे प्रार्थना केली जाते  या दिवशी सकाळीच घरातील, दिवे, समया, निरांजने, लामण दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. दिवे चकचकीत करुन पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते. पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करुन सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून प्रज्वलित करुन ही दीप पूजा केली जाते. काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करुन त्यांचीही पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते. कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात. सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते.
 
         अनेक ठिकाणी सायंकाळी शुभंकरोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं.  हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने रविवार दिनांक ८ ऑगस्ट 2०२१ रोजी दीप अमावस्या साजरी करण्यात आली राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर गोपाळनगर प्राथमिक व गणेशपथ  प्राथमिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन दीप अमावस्या चे महत्व सांगितले गेले व दीप अमावस्या साजरी करून दीप पूजनाचे फोटो वर्ग शिक्षकांकडे पाठवण्याचे सांगण्यात आले होते त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरातील दिवे स्वच्छ घासून पुसून त्यांची छान मांडणी करून दीप पूजन केले व त्यांचे फोटो वर्ग शिक्षकांकडे पाठवले या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन व नियोजन गणेशपथ (प्राथ.) शाळेच्या शिक्षिका सौ हर्षला नलावडे यांनी केले
 
                                    विद्यार्थ्यांनी दीप प्रार्थनेसहीत दिव्यांची मनोभावे पूजा केली .ती प्रार्थना अशी 
 
                                    ‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥
                              अर्थ: -‘‘हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज  आहेस. 
                                                  माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’
 
           या उपक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व पालकांनी विद्यार्थ्यांना दिप पूजनाचे महत्त्व सांगून घरी         त्यांच्याकडून दीपपूजन करून घेतले दिव्यांची आरास करून घेतली त्याबद्दल गणेशपथ(प्राथ.) शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.सुदेष्णा महाकाळ व गोपाळनगर (प्राथ.) शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. भावना राठोड यांनी पालकांचे शाळेच्या वतीने आभार मानले.