स्नेहसंमेलन

Source :    Date :01-Jan-2020
                     
Snehasamelan_1  
                   
                         स्नेहसंमेलन
 
           स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांचा दृष्टीने आनंदाचा सोहळा असतो.आनंदाला उधाण येऊन सहकार्य, एकोपा यांचा बळावर विद्यार्थी, संमेलन यशस्वी करतात.
            बक्षिसांचा मानकऱ्यांना, कलाप्रेमी बालचमूंना व स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवा करणाऱ्या कष्टाळू विद्यार्थ्यांना कौतुकाची पोच पावती स्नेहसंमेलनात मिळते .
             आमच्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन बुधवार दिनांक ०४.१२.१९ ला शाळेच्या भव्य मैदानावर स.८ वा उत्साहात संपन्न झाले.सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कलाप्रेमी मा.श्री.अमोल पाटील कलाशिक्षक ,के.सी.गांधी विद्यालय कल्याण हे.त्याचबरोबर संस्थेचे स्नेहसंमेलन उपक्रम प्रमुख मा.श्री.विद्याधर शास्त्री,संस्था सदस्य मा.श्री.शशिकांत कर्डेकर उपस्थित होते व परीक्षक म्हणून सौ.दीपाली काळे व सौ.पडसलगीकर यांनी काम पाहिले.
स्नेहसंमेलना निमित्त शाळेत मेहंदी स्पर्धा, मुखवटे स्पर्धा व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला वा आनंदाची अनुभूती घेतली.
 

Snehasamelan_1  Snehasamelan_1  

Snehasamelan_1