आंतरराष्ट्रीय योग दिन
निरोगी तन आणि शांत मन याची गुरुकिल्ली म्हणजे योग
'महर्षी पतंजली' हे योगाचे प्रणेते असल्याचे मानले जाते .योग साधनेत जीवनाचे संपूर्ण सार समाविष्ट आहे .यावर्षी २०२१ च्या योग दिनाची थीम 'Be with Yoga, Be At Home 'म्हणजेच 'योगासह रहा ,घरी रहा 'अशी आहे .दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे घरीच राहून योग करण्याचे आवाहन करण्यात येत आहे .
योगदिनाच्या निमित्ताने आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांसोबत ऑनलाईन पध्दतीने दि २१ जून रोजी सकाळी ७ वा योगसाधनेचे आयोजन केले होते.
कार्यक्रमांची रूपरेषा
१.प्रार्थना
२.पूरक हालचाली
३.सूर्यनमस्कार
४.उभी आसने
५.बैठी आसने
६.पोटावर झोपून करायची आसने
७. पाठीवर झोपून करायची आसने
८.प्राणायाम
९.ध्यानधारणा ,शांतीपाठ
स्वा .वि. वि. मं .अरुणोदय माध्यमिक शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. रविंद्र पवार सरांनी उत्तम प्रकारे ,योग्य मार्गदर्शनासह सर्व प्रात्यक्षिकासह आसने करून घेतली.
मा. मुख्याध्यापिका ,शिक्षक ,विदयार्थी सर्वानी उत्तम प्रकारे सर्व आसने केली. अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबध्द पद्धतीने संपन्न झाला.