जल्लोष स्वातंत्र्याचा,स्मरण त्यागाचे,प्रेरणा प्रगतीची.

Source :    Date :16-Oct-2019

जल्लोष स्वातंत्र्याचा, स्मरण त्यागाचे, प्रेरणा प्रगतीची

असंख्यांनी केले सर्वस्व अर्पण तुजसाठी,

अनेकांनी केले बलिदान, 

वंदन तयांसी करुनिया आज,

गाऊ भारत मातेचे गुणगान.”

         भारत मातेच्या अमर सुपुत्रांची आठवण करून देण्यासाठी व आजच्या भावी पिढीला प्रेरणा देण्यासाठी आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो.

भारतात साजरा होणाऱ्या सांस्कृतिक सणांसोबत देशाचाहि सण सर्वासाठी महत्वाचा आहे ,याची नकळत पण अमीट जाणिव ह्या कार्यक्रमातून होत असते.

आमच्या स्वामी विवेकानंद, रामनगर शाळेत हा स्वातंत्र्याचा उत्सव अर्थात १५ ऑगस्ट – भारताचा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठिक ७.३० वाजता सन्मानीय शाळा समिती अध्यक्ष श्री. मुजूमदार सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. शिंदे बाई यांनी मुलांना ध्वजप्रतिज्ञा सांगितली.मान्यवरांनी विध्यार्थ्यांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या. आपला राष्ट्रध्वज आपल्या सर्वाना एकत्र ठेवणारा मानबिंदू कसा आहे हे समजावून सांगितले.

विध्यार्थ्यांचाही प्रत्यक्ष सहभाग अशा कार्यक्रमात हवा म्हणून मुलांसाठी देशभक्तीपर समुहगीत स्पर्धा आयोजित केली होती. मुलांनी जोशपूर्ण व उत्साही वातावरणात देशभक्तीपर समुहगीते सादर केली.

सदरच्या कार्यक्रमास सन्मानीय शाळा समिती अध्यक्ष श्री. मुजूमदार सर. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. शिंदे बाई, पालक प्रतिनिधी, उपस्थित होते.