“स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन कारण ते जिथे असतात तिथे स्वर्ग निर्माण होतो”- लोकमान्य टिळक• विनम्र अभिवादन

Source :    Date :05-Aug-2020

   

 
LOKMANY TILAK_1 &nbs

            

      स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन कारण पुस्तके जिथे असतात तिथे स्वर्ग निर्माण होतो”- लोकमान्य टिळक.

                                                        विनम्र अभिवादन

        जहाल मतवादी,लोकमान्य,भारतीय असंतोषाचे जनक,भारताचा तेजस्वी क्रांतीसूर्य,आजन्म देशसेवक, पारतंत्र्यात असतानाही "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” असा सरकारला रोखठोक प्रश्न विचारणारे, अशा न संपणाऱ्या अनेक उपाध्या ज्यांच्या नावासोबत जोडल्या जातात ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.

      एक ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. या महान नेत्याच्या कार्याची आठवण व या महान नेत्याच्या कार्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रामनगर प्राथमिक शाळेत उत्साहाने साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्यावर आधारित कविता सादर केल्या. त्यांच्या कार्याचे संकलन करून कथन केले. त्यांच्या कार्यावर आधारित लेखन करण्याचा प्रयत्न केला व या सर्व माध्यमांतून विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन केले.

     विशेष कौतुकाची बाब म्हणजे हे सादरीकरण दरवर्षी शाळेत होत असते. मात्र यावर्षी
हे घरी होत होते व त्याची क्षणचित्रे  विद्यार्थी ऑनलाइन पाठवत होते. जागा बदलली, साधने बदलली परंतु ध्येयप्राप्ती कडे वाटचाल अविरतपणे चालू आहे, हेच लोकमान्यांना खरे अभिवादन

.
     
 

  "मनुष्याचा स्वभाव कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही."