रामनगर शाळेत दीपअमावस्या साजरी

Source :    Date :22-Aug-2019
आपल्या हिंदू संस्कृतीत अनेक सण साजरे केले जातात.असाच एक सण म्हणजे “दीपअमावास्या”. दीपअमावास्या म्हणजे आषाढ अमावस्या होय.


 
 
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रामनगर शाळेत बुधवार दि. ३१/०७/२०१९ रोजी दीपअमावस्या साजरी करण्यात आली.पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक सदरच्या उपक्रमात सहभागी झाले होते.
 
“वसुधरेचे हिरवे लेणे,
लावा वने वाचवा वने”
 
असा पर्यावरण सवर्धनाचा संदेश देण्यात आला. पानाफुलांची सुंदर रांगोळी काढून त्याभोवती वेगवेगळ्या आकाराचे व प्रकारचे दिवे लावून सजावट करण्यात आली होती.संस्थेचे सहकार्यवाह मा. श्री. उंटवाले सर सर यांनी सदरच्या उपक्रमास भेट देऊन शिक्षकांचे व विद्यार्थ्याचे कौतुक केले.