प्रवेशोत्सव

Source :    Date :23-Aug-2019

शनिवार दि. १५/०६/२०१९ रोजी २०१९-२० या शेक्षणिक वर्षातील पहिला दिवस विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला.शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढण्यात आली.पताका लावण्यात आल्या.वर्ग सजावट करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांचे ढोल- ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.


 

विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा समिती सदस्य मा. श्री. इनामदार सर उपस्थित होते. मा. श्री. इनामदार सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिंदे बाई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नविन पुस्तकांचे वाटप करण्यात आले.पोषण आहार योजनेंतर्गत मुलांना गोड खाऊ देण्यात आला.