एकदिवसीय परिसंवाद : चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम

Source :    Date :29-Aug-2019
दिनांक 30 जुलै 2019 रोजी राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली संचालित स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने CBCS - "चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम" ("CHOICE BASE CREDIT SYSTEM") च्या संदर्भात एक दिवसीय माहिती सत्र डॉ हेडगेवार सभागृह, राणा प्रताप भवन, डोंबिवली येथे आयोजित करण्यात आले होते.
 
राष्ट्रीय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ श्री सुभाष वाघमारे, मा. राज्यपालांनी मॅनेजमेंट कौन्सिल वरील नियुक्त प्रतिनिधी श्री दिपक मुकादम, डॉ श्री अजय देशमुख, रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ, डॉ अनुजा पळसुले देसाई, प्राचार्या, स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालय.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर, शैक्षणिक वातावरणात अनेक चांगले बदल झालेलेले आहेत. त्यातील काही बदलांची सुरुवात भारतामध्ये व्हावी या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसी ने काही बदल सुचवले आहेत. त्यांची अंमलबजावणी कशाप्रकारे होईल या संबंधीची माहिती, महाविद्यालयांचे प्राध्यापक व संस्थाचालक यांना मिळावी, यासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत असलेल्या पूर्व उपनगरातील महाविद्यालयांसाठी याचे आयोजन करण्यात आले होते.
 
संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ श्री अजय देशमुख हे उपस्थित होते. राज्यपालांचे मॅनेजमेंट कौन्सिल वरील नियुक्त प्रतिनिधी असलेले श्री. दिपक मुकादम यांच्या प्रयत्नाने हे सेमिनार डोंबिवलीत आयोजित केले होते. त्यांनी स्वतः उपस्थित राहून या संबंधात बहुमोल मार्गदर्शन केले.

 
डॉ श्री अजय देशमुख, रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ यांचे स्वागत करताना, राष्ट्रीय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ श्री सुभाष वाघमारे
 
सध्या आपल्या देशामध्ये विविध विद्या शाखांमधून शिक्षण दिले जाते. जसे की वाणिज्य, विज्ञान, विधी, आयुर्विज्ञान, आर्किटेक, नृत्य गायन इत्यादी. संबंधित शाखेत नेमून दिलेल्या विषयांचा गट घेऊनच तो अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर असा कप्पा बंद अभ्यासक्रम शिकवला जात नाही. प्रवेश घेताना मनाजोगता विषय निवडण्याची मुक्त परवानगी विद्यार्थ्यांना असते. जसे की वाणिज्य शाखेत प्रवेश घेताना अकाउंट्स या विषयाबरोबर भौतिक शास्त्राचा ही अभ्यास करण्यास परवानगी दिली जाते. नवीन पद्धतीत याचे मूल्यमापन करताना मार्क देण्याच्या प्रचलित पध्दतीत बदल होवून हे "क्रेडिट" मध्ये होईल. ठराविक क्रेडिट मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त होईल.
 
या सेमिनार मध्ये मुंबई विद्यापीठाच्या आंतरशाखीय अभ्यासाच्या (डीन) अधिष्ठाता डॉ रश्मी ओझा यांनी उपस्थित राहून बहुमोल मार्गदर्शन केले.
 
 
इतर उपस्थित मान्यवरांमध्ये शिक्षण तज्ञ प्राध्यापक श्याम अत्रे, तसेच, सोमय्या तंत्र महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. मिलिंद मराठे यांनी उपस्थित राहून संबंधित विषयाची सविस्तर माहिती दिली.
 
विषय निवडी (CBCS) संबंधात विद्यार्थ्यांचे काय विचार आहेत हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी असलेल्या श्री आलोक तिवारी व श्री मिहीर देसाई यांना निमंत्रित केलेले होते. त्यांनी या सेमिनार मध्ये अभ्यासपूर्ण माहिती मांडली.
 
सेमिनारच्या समारोपाच्या सत्रात श्री. चंद्रशेखर वझे यांनी खुमासदार शब्दात कार्यक्रमाचा समारोप केला.
 
या सेमिनारची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली .राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ श्री सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले व स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ अनुजा पळसुले देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रयोजन निवेदित केले.