ग्रंथ प्रदर्शन

Source :    Date :31-Aug-2019

महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे गुरुवार, दि. ऑगस्ट २०१९ रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला फीत कापून प्राचार्य डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.


 

त्यानंतर सरस्वती पूजन झाल्यावर त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रंथांचे महत्त्व विशद केले. पुस्तक पेढी योजनेतील निवडक विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पुस्तक संच देण्यात आले.

तसेच ग्रंथपाल डाॅ. श्रीनिवास आठल्ये यांनी विद्यार्थ्यांना प्रदर्शनाचा हेतू समजावून सांगितला. प्रदर्शनातील ग्रंथांची मांडणी कशी केली आहे, त्याची माहिती दिली.


 

लोकमान्य टिळक स्मृतिशताब्दीनिमित्त एक विशेष दालन मांडण्यात आले होते. तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचेही दालन मांडले होते. त्यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यात आली.


 

या प्रदर्शनासाठी सोनाली देसाई, भूषण पाटील, माधुरी रनाळकर या स्वयंसेवकांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी खूप मेहनत घेतली. तसेच प्रा. अमित जोशी, श्री. शशिकांत गाणार, श्री. सुरेंद्र आंब्रे आणि इतर शिक्षकेतर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.

या प्रदर्शनाला अतिथी अभ्यागत, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.