Events

Report on "Two Day Workshop on Writing Better MCQ's based on Bloom's Taxonomy"

राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवलीआणिस्वामी विवेकानंद कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय, डोंबिवलीयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितसोमवार, दि. १८ जानेवारी २०२१ व मंगळवार, दि. १९ जानेवारी २०२१अहवालराष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली आणि स्वामी विवेकानंद कला व वाण..

स्वतःला बदलताना...

साधारण पंधरा वर्षांपूर्वी मी स्टीफन कोव्ही यांनी लिहिलेल्या 'सेव्हन हॅबिटस् ऑफ हायली इफेक्टीव्ह पिपल' या पुस्तकाचा आधार घेऊन त्या पुस्तकाच्या संपूर्ण सादरीकरणाचा पूर्ण एक दिवसाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी करीत असे. कालांतराने त्या..

|| दाता भवति वा न वा ||

;मध्यंतरीच्या काळात संस्कृत सुभाषितांचा अभ्यास करीत असताना दानशूर व्यक्तीची उपलब्धता किती दुर्मीळ असते हे दर्शविणारे सुभाषित वाचनात आले. सुभाषितकार असे म्हणतात की,शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पण्डितः|वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ||अर्थात् शंभरात एक शूर निपजतो, हजारात एक पंडित असतो, दहा हजारात एक वक्ता मिळतो, पण दानशूर व्यक्ती मिळणे खूपच मुश्किल आहे. का बरे असे सुभाषितकार म्हणतात? दान एव्हढी कठीण क्रिया आहे? दानाची महती एव्हढी असूनसुद्धा दानशूर व्यक्तींची समाजात वानवा असावी..

चैतन्याचा झरा

सोमवार, दि. १३ /७ /२०२०मध्यंतरीच्या काळात समाजसेवकांच्या समाजसेवेबद्दल एक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यात आला. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अनेक उपेक्षित क्षेत्रात विविध व्यक्ती समाजसेवेचे व्रत घेऊन सेवा बजावण्याचे कार्य करीत आहेत. यातील ब-याचशा व्यक्ती या निःस्पृहपणे कोणत्याही प्रसिद्धीची हाव न बाळगता अत्यंत सचोटीने व प्रामाणिकपणे आपल्या कार्यावर निष्ठा ठेवून कार्य पूर्णत्वास नेत असतात. सेवा म्हणजे काय? सेवाभाव म्हणजे काय? सेवेने काय साधते? असे अनेक प्रश्न माझ्या मनात रुंजी घालत होते. त्या प्रश्नांची ..

हा छंद जीवाला लावी पिसे!

शनिवार, दि. ११/ ७/ २०२०साधारणतः गेले तीन महिन्यांपक्षा जास्त काळ मी सातत्याने नियमितपणे दररोज लेख लेखनाचे काम करीत आहे. मी काही सिद्धहस्त लेखक नाही आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक तर त्याहूनही नाही. परंतु तरीही नियमितपणे लेखन माझ्या हातून कसे काय झाले? बरं या..

बंध मैत्रीचे

ऑगस्ट महिना जसजसा जवळ येऊ लागतो तसतसे महिन्याच्या पहिल्या रविवारी येणा-या मैत्री दिवसाचे वेध लागू लागतात. ..

चाय पे चर्चा!

मंगळवार, दि.  ७/ ७/ २०२०गेले दोन तीन दिवस आषाढसरी आभाळातून धबाधबा कोसळत आहेत. त्यामुळे चहाप्रेमींची चहाची चाह मर्यादेबाहेर वाढली आहे. आले, मसाला घालून उकळवलेला मस्तपैकी वाफाळणारा चहा चहाप्रेमींच्याच नव्हे तर इतरांच्याही घशाखाली उतरला की अनोखी तरतरी येते. चहा कोणीही कधीही कितीही वेळा प्यावा! भले मग तो आजारी असल्याच्या निमित्ताने घेतलेला चहा असो वा लहानपणी दोन्ही हातांनी बशी धरून टाॅम अॅण्ड जेरी बघत आईने फुंकून दिलेला चहा असो! पत्त्यांचा डाव आणि गप्पांची मैफिल रंगात आल्यानंतरचा कांदाभजी बाजूला ..

वारी ते परतवारी!

सोमवार, दि.  ६/ ७/ २०२०महाराष्ट्रात पंढरपूरची वारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करतात. आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करून माऊलीचे प्रत्यक्ष किंवा कळसाचे दर्शन घेऊन आपापल्या घरी मिळेल त्या वाहनाने परततात. ज्ञानोबा, तुकोबा यासारख्या संतांच्या पालख्याही पंढरपुरात संतांचा मेळा झाल्यावर दोन दिवस विसावा घेऊन गुरुपौर्णिमा झाली की आपापल्या मुक्कामी परत जाण्यास रवाना होतात. ..

|| गुरु विणा नाही नर नारायण ||

रविवार, दि.५/ ७/ २०२०आज आषाढ पौर्णिमा! म्हणजेच गुरुपौर्णिमा! महर्षी व्यासांनी लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्य गुरू आहेत. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते. आपण ज्याच्याकडून ज्ञान प्राप्त करतो त्या गुरूंप्रती आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. आपण कोणाचेतरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरू शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूंची प्रार्थना करावयाची तो हा दिवस होय! समर्थ रामदास स्वामी ..

चमत्कारिक चमत्कार |

शनिवार, दि. ४/ ७/ २०२० |कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेनंतर विठुरायाला काहीही चमत्कार करून संपूर्ण विश्वावरचे संकट नाहीसे करण्यासाठी साकडे घातले. वेळोवेळी पांडुरंग आपल्या भक्ताच्या मदतीसाठी धावून येतो. अशा आशयाच्या कथा आपल्या पुराणात भरपूर प्रचलित आहेत. परंतु असा चमत्कार खरोखरीच होतो का हो? की केवळ या सुरम्य कल्पनाच? की भोळी भाबडी माणसे घटनेमागची शास्त्रीय कारणे माहीत नसल्याने त्याला चमत्कार असे संबोधतात? की याला श्रद्धेय ..

या सुरांनो या

सध्याच्या दिवसांत व्हाॅटस् अॅपवर एका व्हिडिओने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. ..

उपवासाची सुखांतिका की शोकांतिका?

गुरुवार, दि. २/ ७ /२०२०कालच आषाढी एकादशी झाली. आपल्यापैकी ब-याच जणांनी 'एकादशी आणि दुप्पट खाशी' या न्यायाला अनुसरून साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी, दाण्याची आमटी, वरी तांदळाचा भात, भाजणीचे थालीपीठ, साबुदाणा वडा, काकडीची कोशिंबीर, श्रीखंड, खसखसची खीर, अळीवाचे वा डिंकाचे लाडू, खजुराच्या वड्या वगैरे वगैरे पदार्थांवर यथेच्छ ताव मारून 'उपवास' केला असावा. माझ्या अंदाजानुसार आपल्या महाराष्ट्रात जेव्हढ्या उपवासाच्या पदार्थांची रेलचेल आहे तेव्हढी अन्य कुठल्याही प्रदेशात नसावी. धन्य त्या घरोघरीच्या अन्नपूर्णा! ..

卐 बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल 卐

बुधवार, दि. १ / ७ / २०२० आज देवशयनी आषाढी एकादशी! प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक व कृष्ण पक्षात एक याप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस वेळा एकादशी येते. अधिक मास असल्यास त्या दोन एकादशी जास्त असतात. पण त्यापैकी आषाढी व कार्तिकी एकादशी व त्यातही आषाढी एकादशीचे महत्त्व अधिक मानण्यात येते. आषाढ महिन्यातील एकादशीला फार पवित्र मानण्यात येते. म्हणून या एकादशीला महाएकादशी म्हणतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे नामस्मरण करून आत्मिक शांती व मोक्ष प्राप्तीची इच्छा पूर्ण केली जाऊ शकते. सर्व ..

...वो फिर नही आते!

मंगळवार, दि. ३० /६/ २०२०रात्रीच्या वेळी सर्व आवराआवर झाल्यावर शांतपणे चिंतन करीत बसले असताना दूरवरून येणा-या गीताच्या ओळी कानावर पडत होत्या. 'आप की कसम' चित्रपटातील प्रसिद्ध नट राजेश खन्ना याच्यावर चित्रित केलेले ख्यातनाम गीतकार आनंद बक्षी यांनी शब्दबद्ध केलेले गीत होते ते. 'जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम, वो फिर नही आते!' किती अर्थपूर्ण आहे ही काव्यरचना! हे गीत मी पूर्वी अनेकदा ऐकले होते. पण का नकळे, त्या दिवशी त्या गीताच्या शब्दांनी मनाचा ठाव घेतला. हृदयाला भिडले म्हणा ना ते शब्द!  खरोख..

हासून ते पहाणे...

सोमवार, दि. २९ / ६/ २०२०सकाळच्या वेळी बागेत बसून वृत्तपत्रातील बातम्या वाचताना एकाएकी मोठमोठ्याने हसण्याचा आवाज कानी पडला. आवाजाच्या दिशेने पाहिले असता काही माणसे एकत्र येऊन मोठमोठ्याने हसत असल्याचे दृश्य दिसले व डोक्यात प्रकाश पडला. हास्यक्लबचे सदस्य त्यांचे नियमितपणे करावयाचे हसण्याचे कार्य पार पाडत होते. आणि त्यांचे ते विनाकारण मोठमोठ्याने हसणे बघून मलाही हसू आवरेनासे झाले. का बरे अशी ही माणसे विनाकारण हसतात? काय असतो हास्यक्लब? त्याचे प्रयोजन तरी काय? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा ..

'सुख' म्हणजे नेमकं काय असतं?

रविवार, दि. २८/ ६/ २०२०'मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मिळालंय म्हणेस्तोवर हातात काही नसतं!' अशा शब्दांचे गाणे एका नाटकात ऐकल्याचे आठवते. तर सुख म्हणजे आत्ता होते आणि आत्ता गेले असे ज्याच्याबद्दल वाटते ते सगळे, असा त्याचा सर्वसमावेशक व्यापक अर्थ! सुख हे खरेच असते का? हे अगोदर तपासून पाहावे लागेल. बोटांना चावणारा बूट पायातून काढल्यावर किती सुख मिळते! आणि पायात असताना असते ते दुःख! बस्स, सुख हे असेच आहे.  सुख म्हणजे नक्की काय असते? हा प्रश्न आपल्यापैकी सर्वांनाच पडत असतो. प्रत्येकाची ..

卐 वास्तू देवो भव 卐

शनिवार, दि. २७/ ६/ २०२० काल सहजच दुपारच्या फावल्या वेळेत यु-ट्यूबवर व्हिडिओ धुंडाळत असताना वास्तू शास्त्राविषयी माहिती देणारा व्हिडिओ दृष्टीस पडला. परंतु तो खूपच त्रोटक असल्याने मला तो बघून त्या विषयीची परिपूर्ण माहिती काही मिळाली नाही. म्हणूनच माझ्यासारख्या जिज्ञासू विद्यार्थ्याचे डोके शांत कसे राहणार? म्हणून त्याविषयी माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला असता जे काही मला उमगले ते प्रस्तुत लेखात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, तुम्हाला किती उमगतेय!   माणसाला अन्न, वस्त्र, निवारा ..

माझा ब्रँड- माझा विचार

शुक्रवार, दि. २६ /६ / २०२०आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांनी 'आत्मनिर्भर भारत' घोषणा दिल्यापासून निरनिराळ्या प्रसिद्ध ब्रँडसचे उगमस्थान कोणता देश आहे, हे पाहण्याचा मला छंदच जडलेला आहे. रोजच्या दैनंदिन व्यवहारात उपयोगात आणल्या जाणा-या निरनिराळ्या वस्तूंचे व सेवांचे ब्रँडस पडताळून त्या वापरायच्या की नाही, याचे अवलोकन करण्यासाठी मुख्यत्वेकरून 'ब्रँड' या संकल्पनेचा विचार केला असता जे काही मनात आले ते तुमच्यासमोर मांडत आहे. सध्याचा जमाना हा ब्रँडचा आहे. ब्रँडेड वस्तू वापरणे म्हणजे स्टेटस झालेले ..

अती राग आणि भीक माग |

गुरुवार, दि. २५/ ६/ २०२०सकाळच्या घाईच्या वेळेत स्वयंपाकघरात काम करीत असताना शेजारील इमारतीमधील एका घरातून जोरजोरात चाललेल्या भांडणाचा आवाज कानी पडत होता आणि शेवटी त्याचे पर्यावसान जोराने दरवाजे आदळणे व भांडी आपटण्यात होत होते. हे कानावर पडलेल्या आवाजावरून कळत होते. भांडणाचे रूपांतर अतिक्रोधात झाले होते व तो आक्रस्ताळेपणा करून व्यक्त केला जात होता. सर्व प्रसंगाचा विचार करता माझ्यातील होतकरू मानसशास्त्राचा विद्यार्थी जागृत झाला व राग या भावनेविषयी अभ्यास सुरू केला. त्या अभ्यासातून मला जे काही उमगले ..

पुराण मातीचे...

बुधवार, दि. २४/ ६/ २०२०सध्या भारत- चीनच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. आधीच जगभराला कोरोनासारखा महाभयंकर रोग देण्यासाठी कारणीभूत ठरलेला चीन भारताशी युद्ध सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सर्वत्र भारतीय जनतेला चिनी बनावटींच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तद्वत् जर बहिष्कार घातला नाही तर देशद्रोही ठरण्याची भीती आहेच. म्हणून फावल्या वेळात घरात कोणत्या चिनी बनावटीच्या वस्तू आहेत याची पडताळणी करत असताना विविध आकाराच्या चिनी मातीच्या बरण्या दृष्टीस पडल्या. मोहक आकाराच्या वेगवेगळ्या ..

आईपण!

मंगळवार, दि. २३/ ६/ २०२०आज माझ्या आईचा हिंदू पंचांगाप्रमाणे स्मृतिदिन आहे. आषाढातला जोरात कोसळणारा पाऊस सुरू झाला की तिच्या आठवणींनी मन कातर होते. त्यातच यंदा संचारबंदीमुळे सर्वच कुटुंबिय घरात असल्याने देश विदेशातील कुटुंबियांनासुद्धा सहभागी करून घेऊन ऑनलाईन स्नेहसंमेलने चालू असतात. साथीच्या वाढत्या संक्रमणामुळे जरी भौगोलिक अंतर जास्त असले तरी सर्व कुटुंबिय मनाने जास्तच जवळ येत आहेत व ऑनलाईन स्नेहसंमेलनाद्वारे आनंदाची लयलूट करीत आहेत. अशाच एका प्रसंगात माझ्या आईची आठवण निघाली व सर्वच जण आपापले अनुभव/ ..

योगदिनाच्या निमित्ताने...

काल दि. २१ जून. संपूर्ण जगात योग दिवस साजरा झाला. योग दिवस ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली पवित्र भेट आहे. भारत सरकारच्या प्रयत्नाने सुरू झालेला व जगभर पाळला जाणारा असाच एक दिवस म्हणजे योग दिवस...

ग्रहण...

रविवार, दि. २१/ ६/ २०२०माझं आभाळ...माझं आभाळ- माझ्या अभिव्यक्तीचा आविष्कार! आपल्या रोजच्या जीवनाच्या रहाटगाडग्यात अनेक ब-यावाईट प्रसंगांना आपण सामोरे जातो. त्यातल्या काही घटना ब-याच काळ आपल्या मनात रुंजी घालत असतात. त्या अनुषंगाने अनेक साधकबाधक विचार व्यक्त करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न! प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या मते आभाळ आणि आकाश यात फरक आहे. आभाळ असतं काळ्याकुट्ट मेघांनी भरलेलं. पाऊस येणार, सुख समृद्धी येणार याचे भविष्य वर्तवणारं. तर आकाश असतं निरभ्र. जिथे मेघांचे अस्तित्वच नाही. ..

टाळेबंदीची फलश्रुती!

डिसेंबर २०१९ मध्ये कोरोना विषाणूने चीन या देशात प्रवेश केला व हळूहळू जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे संपूर्ण विश्वात त्याचा फैलाव झाला. ..

थेंबे थेंबे तळे साचे!

कोरोना पश्चात काळात भारतीय नागरिकांनी विशेषतः मध्यमवर्गीय नागरिकांनी आपला आर्थिक व्यवहार नेटका ..

प्रयत्नांती परमेश्वर!

बुधवार, दि १०/ ६/ २०२० दुपारच्या वेळेत व्हाॅटस् अॅपवरील संदेशांचे वाचन करीत असताना एक अनोखा संदेश वाचनात आला. 'वर्क फ्राॅम होम'चे जबरदस्त उदाहरण होते ते. टाळेबंदीमुळे सर्वच ठिकाणच्या पौरोहित्याचे काम करणा-या सर्वच पुरोहितांवर- गुरुजींवर उपासमारीची वेळ आली आहे. देवळे बंद, लग्नसमारंभ स्थगित, मोठे धार्मिक कार्यक्रम गर्दी टाळण्यासाठी बंद, इतर घरगुती पूजा- शांती कार्यक्रमांना बाहेरील व्यक्ती घरात नको म्हणून कामालाही कोणी बोलावत नाही. अहो, इतकेच काय, अंत्यविधी वेळचे अंत्यसंस्कार करण्यासाठीसुद्धा बंदी? ..

व्रत बांधिलकीचे!

मंगळवार, दि. ९/ ६/ २०२० व्रत बांधिलकीचे! पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुभासिनी मिस्त्री यांच्या कर्तृत्वाची कहाणी होती ती. एका स्त्रीने मनात आणलं तर ती काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुभासिनी मिस्त्री! अत्यंत गरीब घरात जन्मलेल्या या सुभासिनीचे १२व्या वर्षी लग्न झाले व वयाच्या २४व्या वर्षी चार मुले पदरात असताना तिच्या नव-याचे औषधपाण्याच्या अभावी दुर्दैवी निधन झाले. अतिशय गरिबी व त्यामुळे पैसे नसल्याने तिच्या नव-याला इस्पितळात प्रवेश नाकारला गेला व त्यामुळे त्याचा मृत्यू ओढवला. त्याच ..

देऊळ बंद!

सोमवार, दि. ८ /६ / २०२० टाळेबंदी उठवण्याच्या दृष्टीने करावयाच्या प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात दि. ८ जूनपासून केंद्र सरकारने जेथे प्रतिबंधित क्षेत्र नाही तेथील मंदिरे उघडण्यास आरोग्य मंत्रालयाने घातलेल्या अटी व शर्ती यांना अधीन राहून परवानगी दिली आहे. साधारणतः गर्दी टाळण्याच्या हेतूने महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या तिस-या आठवड्यापासून मंदिरे बंद झाली . जरी मंदिरे बंद असली तरी रोजच्या पूजाअर्चा, आरत्या चालू आहेत. परंतु भाविकांसाठी मंदिर प्रवेश बंद केल्याने गर्दी टाळणे शक्य झाले व पर्यायाने साथीचे ..

रेल्वे नव्हे, जीवनवाहिनी!

रविवार, दि. ७/ ६/ २०२०परवाच्याच दिवशी डोंबिवली पूर्वेकडून पश्चिमेला जाताना रेल्वे पादचारी पूल ओलांडण्याचा प्रसंग आला. नेहमी माणसांची दुथडी भरून वाहणारा रेल्वे पूल व त्याखालील लांबच लांब जाणा-या रुळांवरून क्षणाक्षणाला धावणा-या रेल्वे गाड्या, मग त्या मालगाड्या असोत वा बाहेरगावच्या प्रवासी वाहतुक करणा-या गाड्या असोत वा मुंबई ते कर्जत, मुंबई ते कसारा प्रवास करणा-या रेल्वे उपनगरी गाड्या असोत, याचे लोभसवाणे दृश्य गेल्या कित्येक दिवसांपासून दिसणे दुरापास्त झाले आहे. खचाखच गर्दीने भरलेली रेल्वे स्थानके व ..

अरे मानसा मानसा, कधी व्हशील मानूस?

शनिवार, दि. ६ /६ /२०२० फावल्या वेळात इंटरनेटवर बातम्या चाळत असताना एका भुकेल्या गर्भवती हत्तिणीला फटाकेयुक्त अननस खायला दिल्याने तिचा तडफडून मृत्यू झाल्याची बातमी वाचनात आली. केरळ राज्यात मलप्पुरम् येथे प्राण्यावरील अत्याचाराची घटना घडली आहे. अन्नाच्या शोधात ही मलप्पुरम् जिल्ह्यातील भुकेली हत्तीण जंगलातून बाहेर आली. ती अन्नाच्या शोधात खेड्यात फिरत होती. काही खोडकर व निर्दयी लोकांनी या गर्भवती हत्तिणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. हत्तिणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तिणीच्या गर्भाशयात ..

卐 माझी वारी, माझा विठोबा 卐

शुक्रवार, दि. ५/ ६ /२०२०काल मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे गेल्यावर्षी आषाढीच्या पंढरपूरच्या वारीत सहभागी होऊन घेतलेल्या अनुभवाच्या संस्मरणीय आठवणी जागृत झाल्या. पण दुर्दैवाने यंदा काही कोरोना विषाणूच्या साथीमुळे नेहमीसारखी मोठ्या प्रमाणात वारी आयोजित केली जाणार नाही आणि त्यामुळे यंदाच्या वर्षात मलाही भक्तिरसात नाहून निघण्याच्या अनुभवापासून वंचित राहावे लागणार आहे.  वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी एक सामुदायिक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील ..

निर्वाणाची शोकांतिका!

गुरुवार, दि. ४  /६ /२०२० दुपारच्या वेळेत वृत्तपत्र वाचत असताना स्मशानात काम करणा-या महापालिकेच्या कर्मचा-यांच्या संदर्भात एक बातमी वाचनात आली . त्यांची कर्मकहाणी अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने स्मशानभूमीमध्ये त्याचा ताण पडू लागला आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत तीन ते चार तासांची प्रतीक्षा करावी लागते. आयुष्यभर विविध कारणांसाठी रांग लावणा-या मुंबईकरांवर शेवटच्या महाप्रवासासाठीसुद्धा रांग लावण्याचे नशिबी येत आहे. मृतदेहालासुद्धा ..

पर्यटनाची ऐशी की तैशी!

खरे पाहता मे २०२० च्या तिस-या आठवड्यात मी कुटुंबियांसमवेत माॅरिशसच्या दौ-यावर जाणार होते. पण माझी यावर्षीची परदेशवारी घडू द्यायची नाही, ..

असुनी नाथ, आम्ही अनाथ!

मंगळवार, दि. १९/ ५/ २०२० संचारबंदीच्या काळात दुपारच्या वेळात मैत्रिणींशी दूरध्वनीवर बोलत असताना प्रत्येकीच्या बोलण्यात वाढलेले घरकाम, रुचिपालटासाठी रोज नवीन करावयाचे पदार्थ, घराची स्वच्छता करण्यात होणारी दमछाक या विषयांवर वारंवार चर्चा होत आहे. घरात..

"जिसका काम उसी को साजे| कोई और करे तो डंडा बाजे||"

शुक्रवार, दि.  १५/४/२०२० फुरसतीच्या वेळात ई- स्वरूपातील वृत्तपत्र वाचन करीत असताना एक अपघाताची बातमी वाचनात आली. जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला रस्त्यावर नाकाबंदीचे काम दिले असताना कर्तव्य बजावताना एका जोरात वेगाने येणा-या गाडीने धडकले व त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना आहे. अशा दुःखद घटना वाचून मन हेलावून जाते. आपले राज्य या कोरोनाच्या संकटातून जात असताना विषाणू विरुद्धच्या लढ्यात २० हजाराहून अधिक शिक्षक सहभागी झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ..

संध्याछाया भिवविती मजला

गुरुवार, दि. १४ /५ /२०२० संचारबंदीच्या काळात दुपारच्या वेळेत डिजिटल स्वरुपातील वृत्तपत्र वाचत असताना फ्रान्समधील एक बातमी वाचनात आली. व्हॅलरी मार्टिन ही फ्रान्समधील बेऑन शहरामध्ये 'व्हिलानोव्हा' नावाचा वृद्धाश्रम चालवते. या वृद्धाश्रमात १०६ वृद्ध नागरिक आहेत. आपल्या वृद्धाश्रमातील प्रत्येकाचा जीव व्हॅलरीला अनमोल वाटत होता. अजूनही प्रत्येकाला खूप जगायचं आहे, त्यामुळे कोरोनाच्या विषाणूला कोणीही बळी पडून चालणार नाही, असं तिने मनाशी ठरवलं. ते कृतीत उतरवण्यासाठी तिने स्वतःला तिच्या कर्मचा-यांसह ..

या जगण्यावर शतदा प्रेम करावे

संचारबंदीच्या काळात काल दुपारी समाजमाध्यमांवरील संदेश वाचीत असताना प्रख्यात उद्योगपती श्री. रतन टाटा यांचा संदेश वाचनात आला. त्यात ते म्हणतात, २०२० हे साल फक्त जिवंत राहायचे वर्ष आहे. ..

याचसाठी का केला होता अट्टाहास?

सोमवार, दि. ११ /५/ २०२०टाळेबंदीमुळे जालना येथील सळई निर्मिती कारखान्यात उत्पादन थांबवण्यात आल्याने मध्य प्रदेशात पायी जाण्यासाठी निघालेल्या सोळा मजुरांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. हे सर्व मजूर मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून चालत होते. चालून थकल्याने रात्री ते रुळावरच झोपले होते. शुक्रवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास जाणा-या मालगाडीखाली ते चिरडले गेले. अतिशय विचित्र अशा या अपघातात या मजुरांचा दुर्दैवी करुण अंत झाला. हृदय पिळवटून टाकणारी अशी ही घटना!    जेव्हा या घटनेवर दुःखद अंतःकरणाने ..

राहिले दूर घर माझे...

रविवार, दि. १०/ ५/ २०२० संचारबंदीच्या काळात निरनिराळ्या कारणाने स्थलांतरित झालेल्या जनतेला त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणी शिक्षणासाठी, नोकरीसाठी, मोलमजुरीसाठी, सणासमारंभानिमित्त, घरापासून दूर दुस-या जिल्ह्यात, राज्यातच नव्हे तर दुस-या देशात गेलेल्या स्थलांतरिताची संख्या कित्येक लाखांच्या घरात आहे. प्रत्येकाचेच डोळे आपापल्या घराकडे, आपल्या कुटुंबियांकडे लागले आहेत. परंतु टाळेबंदीच्या काळात अचानक सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद झाल्याने टाळेबंदी संपण्याची प्रतीक्षा ..

||कलंक मतीचा झडो||

शनिवार, दि.९ /५/ २०२०संचारबंदीच्या काळात दुपारी फावल्या वेळात व्हाॅटस् अॅपवरील एक संदेश वाचनात आला. गेली दहापेक्षा जास्त वर्षे परदेशात पोटापाण्यासाठी राहिलेल्या एका व्यक्तीने लिहिलेला तो संदेश होता. अमेरिका, जर्मनी आणि भारत या तिन्ही देशातील टाळेबंदीची तुलना करून सदर व्यक्तीने त्यावर भाष्य केले होते. लेखाच्या शेवटी भारतीय समाज म्हणून आपली वागणूक लज्जास्पद असल्याचे मत या अमेरिका स्थित अनिवासी भारतीयाने व्यक्त केले होते. प्रस्तुत माझ्या या लेखात मी या 'महनीय' व्यक्तीच्या विचारांवर चिंतन करून केलेले ..

कठीण समय येता आंतरजाल (इंटरनेट) कामास येते!

शुक्रवार, दि. ८/ ५/ २०२०कठीण समय येता आंतरजाल (इंटरनेट) कामास येते!विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सर्व विश्वात तंत्रज्ञानाच्या प्रगतीची घोडदौड वेगाने चालू झाली आणि त्याचाच परिपाक म्हणून संगणकाचा जन्म झाला. जशाजशा संगणकाच्या अधिकाधिक प्रगत, प्रगल्भ, सहज उपयोगी पुढच्या पिढ्या जन्माला येऊ लागल्या, तसतसे सामान्यातल्या सामान्य आबालवृद्धांची नाळ संगणकाशी जोडली जाऊ लागली. कधी गरज म्हणून तर कधी अपरिहार्यता म्हणून! संगणकातून पुढे निर्मिती झाली ती इंटरनेटची. आजच्या युगात टेलिफोनचे महत्त्व जरी अनन्यसाधारण असले ..

मिले न मंदिर, मिले न मस्जिद, मिल जाती है मधुशाला!

गुरुवार, दि.  ७/ ५/ २०२०संचारबंदीच्या दिवसांत फुरसतीच्या वेळात डिजिटल वृत्तपत्र वाचत असताना एक विस्मयकारक बातमी वाचनात आली. त्या बातमीत माहिती दिल्याप्रमाणे सरकारने दारू विक्रीची दुकाने चालू करायला परवानगी दिल्याने बंगळूर स्थित जगातील सर्वात मोठ्या विदेशी दारू विक्री करणा-या टाॅनिक (TONIQUE) या दुकानाने पहिल्याच दिवशी चार कोटी रुपये किमतीची दारू विकली. ही बातमी वाचल्यानंतर डोक्यात विचारांचे भुंगे गुणगुणू लागले. या विचारांना खूप संदर्भ होते. निरनिराळे आयाम होते. चित्रविचित्र कंगोरे होते.कोरोना ..

|| मनी नवेच भाव हे...||

कालपासून महाराष्ट्रात काही ठिकाणी निर्बंध शिथिल झाल्याची बातमी वाचनात आली. अतिसंक्रमित परिसरातसुद्धा प्रतिबंधित क्षेत्र वगळता काही ठिकाणी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. ..

|| इच्छा तिथे मार्ग||

मंगळवार, दि. ५/ ५/ २०२० संचारबंदी- टाळेबंदीच्या काळात फुरसतीच्या वेळेत व्हाॅटस् अॅपवरील संदेश वाचत असताना एक जाहीरातसदृश माहिती देणारा संदेश वाचनात आला. आमच्या डोंबिवलीमध्ये एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने वडापाव विक्रीचा घरगुती व्यवसाय सुरू केला आहे व उदरनिर्वाह करत आहे. माझ्या घरी येणा-या सहकारणीनेसुद्धा सध्या घरगुती कामे बंद असल्याने अर्थार्जनासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे व ती घरपोच भाजी पुरवठा करून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे. अशा घटना पाहिल्यानंतर साहजिकच मनात त्यांच्याप्रती आदर ..

घरात राहू गमतीने...

सोमवार, दि.४/ ५/ २०२०संचारबंदी- टाळेबंदीच्या काळात कोरोना विषाणूशी युद्ध करून त्याचा खातमा करण्यासाठी डाॅक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, परिचारिका, बँक कर्मचारी, सरकारी कर्मचारी महान योद्ध्याप्रमाणे त्यांची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे रोगाचे प्रमाण नियंत्रणात राखण्याचा प्रयत्न होत आहे. या संचारबंदीच्या काळात बाकी सर्व आबालवृद्ध घरात बसून स्वतःचे म्हणजेच पर्यायाने समाजाचेही रोग संक्रमित होण्यापासून रक्षण करीत आहेत.परंतु या सर्व समाजघटकांत लहान मुले, पौगांडावस्थेतील अजाण मुले यांचाही ..

|| एकमेका सहाय्य करू||

रविवार, दि.३/ ५/ २०२०संचारबंदीमुळे फावल्या वेळात वृत्तपत्र वाचन करत असताना राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ झालेली बातमी वाचून मन विषण्ण झाले. गेला महिनाभरापेक्षा जास्त काळ शर्थीचे प्रयत्न करूनसुद्धा अजून रुग्णांमध्ये भयावह वाढ होत आहे. राज्यातील काही भाग जरी कोरोनामुक्त असला, तरी काही जिल्ह्यांत संक्रमणाचा वेग अतिशय जास्त आहे. कोरोनावर मात करणा-यांची संख्या वाढत असली तरी विषाणूची लागण आटोक्यात आणण्यात अपेक्षित यश लाभलेले नाही. आरोग्य यंत्रणांवरील ताण यामुळे वाढला आहे. मुंबईत एका ..

उघड दार देवा आता...

शनिवार, दि.२/ ५/ २०२०संचारबंदी- टाळेबंदीचा तिसरा टप्पा काल जाहीर झाला तसा मात्र जनतेचा धीर सुटत चालला. आतापर्यंत बाळगलेल्या संयमाचा बांध फुटणार की काय, अशी मनात शंका येऊ लागलीय. महिन्याभरापेक्षा जास्त काळ घरात बसल्याने शारीरिक स्वास्थ्याचे, मानसिक वैफल्याचे, आर्थिक चणचणीचे, सामाजिक असहिष्णुतेचे, भविष्यात भेडसावू शकणा-या बेरोजगारीचे, घरेलू हिंसाचाराचे प्रश्न जटील होऊ लागले आहेत.   सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची असणारी स्थिती आणि कोरोनाचे संकट अत्यंत बिकट परीस्थितीला जन्माला घालेल. लोकांना ..

"माणूस नावाचे बेट"

संचारबंदी- टाळेबंदीच्या काळात फावल्या वेळात डिजिटल स्वरूपातील वृत्तपत्रांची पारायणे करीत असताना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीने केलेली घोषणा वाचनात आली...

जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे!

गुरुवार, दि.३०/ ४ /२०२०जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे!जगभरातील अर्थव्यवस्था आता अतिशय घट्टपणे एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संकटामुळे येत्या नजीकच्या काळात भारताला ५००० अब्ज डाॅलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न धोक्यात येऊ शकते. ३० दिवसांपेक्षा जास्त काळ चालू असलेली भारतातली टाळेबंदी याला जबाबदार आहे, तसेच अमेरिका, युरोप, चीन आणि जपानमधील वृद्धी जर तीव्र प्रमाणात मंदावली तर त्याचा परिणाम थेटपणे इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवर होणार आहे. भारत याला अपवाद असणार नाही. भारताची ..

उदरभरण नोहे, जाणिजे....

आजच फुरसतीच्या वेळात व्हाॅटस् अॅप वरील संदेश वाचत असताना संचारबंदी- टाळेबंदीच्या काळात किराणा दुकानातून जनतेने खरेदी केलेले सामान या विषयावरील दुकानदाराने केलेले विश्लेषण वाचले...

अंतर मनामनातले, जनाजनातले!

मंगळवार, दि.२८/ ४/ २०२०कोरोना विषाणूच्या युद्धात सामाजिक अंतर ही एक नवीन संकल्पना उदयास आली आहे. सामाजिक अंतर ठेवा हा संदेश घेऊन सर्वच माध्यमे जनतेला आवाहन करीत आहेत. गळाभेटी घेणे व मुके घेणे या पाश्चात्यांच्या संस्कृतीचे अनुनय करणारे भारतीय तरुण त्यामुळे काहीसे अस्वस्थ झाले आहेत.वास्तविक पाहता हा सगळा प्रकार जरी नवीन वाटत असला तरी वेगवेगळ्या मार्गाने आपण अनेकदा हे सामाजिक अंतराचे भान भारतीय संस्कृतीत सदैव बाळगत आलेलो आहोतच. अंतर ठेवणे हा आपल्या रोजच्या आयुष्याचा भागच झालेला आहे. भारतीय जीवनपद्धती ..

जिच्या हाती पाळण्याची दोरी...

सोमवार, दि.२७/ ४/ २०२०संचारबंदीच्या काळात फुरसतीच्या वेळात इंटरनेटवर सर्फिंग करत असताना एक आश्चर्यचकित करणारी माहिती निदर्शनास आली. त्या माहितीप्रमाणे ज्या राष्ट्रांच्या प्रमुख नेत्या महिला आहेत त्यांनी बलाढ्य व इतर विकसित देशांपेक्षा कोरोना विषाणूंच्या महामारीची परिस्थिती अत्यंत सुयोग्य व परिणामकारक रीतीने हाताळली आहे. अर्थात याला अपवादसुद्धा आहेच. हा काही सरसकट नियम नाही व ज्या राष्ट्रांचे प्रमुख पुरुष आहेत त्यांची निंदानालस्ती करून त्यांना हिणवण्याचा प्रस्तुत लेखाचा उद्देश नाही. ही आहे केवळ शारीरिक ..

||मन करा रे प्रसन्न||

रविवार, दि.२६/ ४/ २०२०संचारबंदीच्या काळात व्हाॅटस् अॅप विद्यापीठातून ऑन लाईन शिक्षण घेत असताना एक व्हिडिओ निदर्शनास आला. अॅपल या विख्यात अमेरिकन कंपनीचा सह- संस्थापक असलेला व अमेरिकेतील बलाढ्य उद्योगपती स्टीव्ह जाॅब्स यांच्या संदर्भातील तो व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये स्टीव्ह जाॅब्स यांनी त्यांना उमगलेले जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडले होते.वयाच्या ५६व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगाने देवाघरी गेलेला हा कोट्याधीश उद्योगपती संपत्ती पायाशी लोळण घेत असूनसुद्धा मरणाच्या दारात उभा असताना निरोगी आयुष्य ..

|| धन्य धन्य हो प्रदक्षिणा...||

शनिवार, दि. २५ /४ /२०२०संचारबंदीच्या संकटकाळात फावला वेळ भरपूर असल्याने बाल्कनीमध्ये वारंवार फे-या होतात. बाल्कनीमध्ये कधीही जा, एक दृश्य नजरेस पडते. वेगवेगळ्या वयाचे कमी-अधिक शारीरिक क्षमतेचे, भिन्न शरीरयष्टीचे, निरनिराळ्या चालीचे तरुण-मध्यमवयीन- नववृद्ध व खरोखरीचे वृद्ध एकतर इमारतीतील जागेत गोल-गोलफे-या घालून प्रदक्षिणा घालीत असतात, नाहीतर शांत वाहनविरहित रस्त्यांवर व्यायाम करण्याच्या नावाखाली एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत फे-या मारीत असतात. काही अती हौशी व दूरदृष्टीचे सावध सज्जन दूरवर नजर पोचावी ..

|| सेतू बांधा रे...||

सकाळी डिजिटल स्वरूपात वृत्तपत्रे वाचत असताना केंद्र सरकारने १९८७ च्या साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी वटहुकूम काढण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची बातमी मुख्यत्वेकरून वाचनात आली. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशात हल्लेही वाढल्याने डाॅक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांना काम करणे मुश्किल झाले आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्ण राहात असलेल्या भागातील नागरिकांचे सर्वेक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचा-यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अशा कार्यकर्त्यांवरही ..

जगायचं कसं? रडत रडत की गाणं गुणगुणत?

सध्या फुरसतीचा वेळ मुबलक असल्याने गुगलवर सर्फिंग करण्यात भरपूर वेळ घालवता येतो. आज दुपारी असेच गुगलत असताना 'जोस साल्वादोर अल्वारेंगा' नामक एका मॅक्सिकन मच्छिमाराची बोट समुद्रामध्ये भरकटल्यानंतर तो चक्क कसा ४३८ दिवस जिवंत राहिला, याची अंगावर रोमांच उभे करणारी घटना वाचनात आली..

संचयाचा महामेरू

आजच्या या संचारबंदीच्या काळात खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर लागलेल्या लांबच लांब रांगांचे दृष्य पाहून मन अचंबित झाले. ..

अशी ही (पदार्थांची) बनवाबनवी!

संचारबंदी- टाळेबंदीच्या काळात स्वयंपाकघरात गरजेपेक्षा जास्त न वावरणारी मी हल्ली अन्नपूर्णेच्या आवेशात उगाचच वावरत असते..

रयतेचे डोके ठिकाणावर आहे काय?

विसाव्या शतकात लोकमान्य टिळकांनी केसरीमधून लिहिलेला 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' ..

"मेरा भारत महान"

या संचारबंदी- टाळेबंदीच्या पहिल्या पर्वात मा. पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार होते. आज काय घोषणा करणार, याबद्दलचे औत्सुक्य छातीची धडधड वाढवत होते..

|| तेथे कर माझे जुळती||

आपणा सर्वांना संकटकाळात नेहमीच आपल्या तारणहाराची प्रकर्षाने आठवण येते...

देव भक्ताघरी धावला!

कुठेतरी रेडिओवर लागलेल्या गीताचे शब्द कानी पडत होते. कबिराचे विणतो शेले, कुठेतरी रेडिओवर लागलेल्या गीताचे शब्द कानी पडत होते. कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम| भाबड्या भक्तासाठी, देव करी काम| कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम|| ..

टाळेबंदीची पंचसूत्री

गेले जवळजवळ २०-२२ दिवस संचारबंदी- टाळेबंदीच्या नष्टचर्यातून आपण सर्वच जण जात आहोत...

जरासा झूम लू मै!

मनावर वैफल्याचे विचार रुंजी घालत असतात. का? कसे? कधी? कुठपर्य॔त? ..

Alumni Assocation of Swami Vivekanand Night College

On the Eve of Republic Day, Jan 25, 2010, an Alumni Association Meeting..

Celebrating National Youth Week at Swami Vivekanand Night College

The Economic and Planning Forum of Swami Vivekanand Night College of Arts and Commerce..

Swami Vivekanand Memorial Lectures

To celebrate the Birth Anniversary of a Milestone Thinker Swami Vivekanand ..

Annual Gathering and Prize Distribution at Swami Vivekanand Night College-2019-20

Rashtriya Shikshan Sanstha’s Swami Vivekanand Night College of Arts and Commerce..

Remembering the Spirit of Jalianwala Baag: An Unfortunate Event

The NSS unit of Swami Vivekanand Night College, Dombivli along with the Historical Review Committee of Dombivli and Akhil Bharatiya Vidyarthi Parishad organsied an event to remember the massacare of Jailianwala Baag. ..

Maha Walkathon

As per the instructions of Government of Maharashtra(PWD) and MMVD, CASI and CSR Diary, Swami Vivekanand Night College of Arts and Commerce, Dombivli organised Maha-Walkathon on 30th November, 2019...

Celebrating Vaachan Prerna Diwas

To mark the Birth Anniversary of Honourable Ex-President of our country, Late Dr. A.P.J . Abdul Kalam, the students’ of Rashtriya Shikshan Sanstha’s Swami Vivekanand Nigh College of Arts and Commerce, Dombivli celebrated Reader Motivation Day on October 15, 2019 at Pandit Dindayal Upadhyaya Hall in the college premises. ..

ग्रंथ प्रदर्शन

महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे गुरुवार, दि. १ ऑगस्ट २०१९ रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला फीत कापून प्राचार्य डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले...

मराठी वाङ्मय मंडळ

सालाबादप्रमाणे याही वर्षी मराठी वाङ्मय मंडळाचा उदघाटन सोहळा थाटात साजरा झाला. सोमवार, दि.२६ ऑगस्ट २०१९ रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व वक्त्या म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री डाॅ सुलभा कोरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षपद डाॅ. सुरेश चंद्रात्रे यांनी भूषवले...

एकदिवसीय परिसंवाद : चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम

संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ श्री अजय देशमुख हे उपस्थित होते. राज्यपालांचे मॅनेजमेंट कौन्सिल वरील नियुक्त प्रतिनिधी असलेले श्री. दिपक मुकादम यांच्या प्रयत्नाने हे सेमिनार डोंबिवलीत आयोजित केले होते. त्यांनी स्वतः उपस्थित राहून या संबंधात बहुमोल मार्गदर्शन केले...

शिक्षण पद्धतीत सनातन भारतीय परंपरा आणि तंत्रज्ञान यांची सांगड आवश्यक

जानेवारी 12: विद्यार्थ्यांना अनुभूती मिळणारे शिक्षण असावे. अनेक प्रयोग व प्रसंग निर्माण करून किंवा प्रसंगाधारित शिक्षण पद्धती असावी. शिक्षण हा धंदा नसून ती एक देशसेवा आहे. यामुळे सनातन भारतीय परंपरा व सध्याचे तंत्रज्ञान यांची सांगड घालून देणारी शिक्षण पद्धती विकसित होणे आवश्यक असल्याचे मत प्रख्यात शिक्षण तज्ञ मिलिंद मराठे यांनी येथे बोलताना मांडले.    राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दरवर्षी होणाऱ्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील स्वामी विवेकानंदांच्या ..

राष्ट्रीय शिक्षण संस्थेची सुवर्ण वाटचाल

शिक्षण हा मानवी अधिकारांचा मूलभूत पाया... या शिक्षणाचे संगोपन एका विशिष्ट शिस्तीत झाले तर ते अधिकच बहरते. शिक्षणाला शिस्तीची जोड देत एक सक्षम, जबाबदार पिढी घडविण्याचे काम डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्था गेली ५० वर्षे अवितरपणे करत आहे. यंदाचे हे या संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेने केले आहे. महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक नगरी म्हणून डोंबिवलीची सर्वमान्य ओळख. पण, आपल्या या संस्कृतीप्रधान ख्यातीबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही या शहराने आपली एक विशिष्ट ..

justo vel efficitur blandit

Donec mattis scelerisque ante sit amet sodales. Maecenas a velit aliquam, tincidunt nibh at, imperdiet enim. Ut elementum sagittis lectus, ac lacinia neque ullamcorper ac. In risus ligula, ultrices ut lorem at, aliquet pharetra eros. Nunc vel molestie magna. Morbi eget lobortis lectus. Nulla rhoncus nulla orci, et eleifend leo pharetra ac.   Aliquam sodales gravida porta. Maecenas mauris mauris, suscipit sed mollis vel, iaculis in dui. Orci varius natoque penatibus et magnis dis parturient ..