राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला आणि पुरस्कार प्रदान समारंभ.

Source :    Date :20-Jan-2020
 
स्वामी विवेकानंद व्याख्या

स्वामी विवेकानंद व्याख्यान माला आणि पुरस्कार प्रदान समारंभ ही एक गाथा आहे

राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली संस्थेच्या वैभवशाली परंपरेची...
युगप्रवर्तक स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आयोजित व्याख्यानमालेची...
ही एक गौरवशाली परंपरा आहे, सामाजिक ,शैक्षणिक, वैज्ञानिक,
सांस्कृतिक क्षेत्रातील आभाळाएवढ्या माणसांचा यथोचित गौरव करण्याची...
 राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली संस्थेच्या १९९३ मध्ये सफल संपूर्ण झालेल्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संस्थेने भविष्यकाळातीलकेलेल्या विधायक संकल्पातील एक संकल्प म्हणजे स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला आणि पुरस्कार प्रदान समारंभ.आज हा संकल्प समस्त डोंबिवली करांचा मानबिंदू झाला आहे. या पुरस्काराचे हे तेविसावे वर्ष त्याच दिमाखात साजरे झाले.
सन २०२० ची ही व्याख्यानमाला दिनांक १० ते १२ जानेवारी या काळात स्वामी विवेकानंद विद्यामंदिर , दत्तनगर, छत्रपती भवन, आयरे रोड, डोंबिवली (पूर्व) येथे संपन्न झाली.

 

 

स्वामी विवेकानंद व्याख्या 
इथे विवेकाचिये नगरी...
पुष्प _ पहिले
शुक्रवार, दि.१० जानेवारी, २०२०
वक्ते- सन्माननीय श्री. सुनील विश्वनाथ  देवधर
विषय- "पूर्वांचलातील बदल"
स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव ' मेरा घर' चे संस्थापक आणि त्रिपुरा राज्याचे प्रभारी सन्माननीय श्री सुनील विश्वनाथ देवधर यांनी.
  याप्रसंगी बोलताना त्यांनी नियोजित 'पूर्वांचलातील बद्दल' सांगण्यापूर्वी सी. ..वर भाष्य करणे अधिक पसंत केले. चालू घडामोडी मधील अनेक चपखल उदाहरणे /दाखले देत देवधर यांनी उपस्थितांना प्रभावित केले.भारतीय नागरिकत्वाचे महत्व आपल्या पहाडी आवाजात केलेल्या भाषणातून स्पष्ट   केले. आणि एन आर सी याबाबत अनेकांच्या मनात असलेले संभ्रम त्यांनी दूर केला
          एनआरसी पहिल्यांदा मांडणाऱ्या पंडित नेहरूंचा हवाला देत त्यांनी हेही आवर्जून सांगितले की आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नका. दिवंगत राष्ट्रपती .पी.जे अब्दुल कलाम यांना दिलेला पाठिंबा ,अंत्योदय योजना, आदिवासी मंत्रालयाची निर्मिती 'माय होम इंडिया' च्या माध्यमातून साकारलेल्या 'त्रिपुरा फेस्टिवल ',आगरतळा सुपरफास्ट ट्रेन या सगळ्या चांगल्या गोष्टी एन आर सी अजूनही मांडणाऱ्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मा. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात झालेल्या आहेत म्हणूनच त्यांच्या मध्ये भारताशी इमान आहे अशा धर्मियांनी  घाबरण्याचे काहीच कारण नाही. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या व्याख्यानात व्यासपीठावरील संस्थाध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे, उपाध्यक्ष श्री. विलास जोशी, कार्यवाह डॉ. दीपक कुलकर्णी यांच्यासह दत्तनगर चे प्रांगण उपस्थित संपूर्ण जनसमुदायाच्या भारत माता की जय वंदे मातरम याजयघोषाने दुमदुमून गेले.
 संस्था सदस्य श्री.विद्याधर शास्त्री यांनी पाहुण्यांचा परिचय तर श्री.अरुण ऐतवडे यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री .हेमंत चोपडे सरांनी केले. कन्याकुमारी येथील शिला स्मारकाची प्रतिकृती आपल्या रांगोळीतून आदिवासी शाळेचे शिक्षक श्री. योगेश भोईर यांनी साकारली तर आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केलेले ईशस्तवन स्वागतगीत ह्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. संपूर्ण श्रोता वर्ग पहिल्या दिवसाच्या व्याख्यानाने देशप्रेमाने मंत्रमुग्ध झाला होता.

            स्वामी विवेकानंद व्याख्या

पुष्प दुसरे
शनिवार ,दि.११ जानेवारी, २०२०
वक्त्या-सन्माननीय डॉ. सौ. ललिता दिपक नामजोशी.
विषय-स्वामी विवेकानंदांचा जीवनाभिमुख वेदांत...
      स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले ते प्रसिद्ध व्याख्यात्या संस्कृत च्या गाढ्या अभ्यासक डॉ. ललिता नामजोशी यांनी.त्यावेळी  त्या  बोलताना म्हणाल्या की संपूर्ण देश एका धाग्याने जोडून घेण्याची ऊर्मी प्रखर राष्ट्रवादी असणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी आपल्याला दिली .नववेदांत मांडणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा जीवनाभिमुख वेदांत सांगताना त्या पुढे म्हणाल्या की ,प्राचीन काळातील वेद, उपनिषदे ,भगवद्गीता यामधून सांगितलेले तत्त्वज्ञान स्वामीजींनी सोप्या भाषेत सांगितले .आपण आपली सर्व इंद्रिये बंद करून दृष्टी आत्म्याकडे वळवली तरच स्वतःचे ज्ञान होईल. देहबोध आत्मबोध हे एकाच वेळी होत नाहीत त्यामुळे स्वामीजींचा वेदांत हा प्रथम जगाकडे पाठ फिरवून स्वतःमध्ये पाहयला शिकवतो .जगामध्ये भेदाभेद विसरून त्यामध्ये एकत्व पाहणे म्हणजे अद्वैत. स्वामींना जीवनाभिमुख वेदांता मध्ये सर्वप्राणिमात्रांची सेवा करणे .अहं भाव  बाळगता मुक्तीचा मार्ग स्वीकारणे जे काही.करायचे  ते स्वतःच्या मोक्षासाठी जगाच्या हितासाठी करणे वेदांत आचरणात आणण्यासाठी दीनदलितांच्या सेवेचा कर्ममार्ग स्वीकारणे, भगवंताची उपासना करणे, सर्वांना शिक्षण देणे ,आरोग्य सुधारण्यास आरंभ करणे, आपल्या आदर्शांना आपल्या पातळीवर आणता आपण त्यांच्या पातळी पर्यंत पोहोचणे आणि वेदान्ताचे तत्वज्ञान आचरणात आणून माझा देश परम वैभवाला कधी पोहोचेल याचा सातत्याने विचार करणे हेच अभिप्रेत होते .स्वामीजींच्या या जीवन विषयक विचारांना आत्मचिंतनाची बैठक घेऊन डॉ. ललित जोशींनी श्रोत्यांना विचारमग्न केले.
     कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे, उपाध्यक्ष श्री विलास जोशी , कार्यवाह डॉ. दीपक कुलकर्णी उपस्थित होते. ईशस्तवन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी तर स्वागत गीत अरुणोदय माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी केले. वक्त्यांचा परिचय डॉ. प्रकाश करमरकर तर आभार डॉ. सरोज कुलकर्णी या संस्था सदस्यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णुनगर माध्यमिक शाळेच्या सौ रेखा गढरी यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता विष्णुनगर शाळेच्या वैभवी आंबेकर हिने गायलेल्या वंदे मातरमने झाली.

 

 

स्वामी विवेकानंद व्याख्या 
 
 
स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान समारंभ
रविवार, दि.१२ जानेवारी, २०२०
वेळ: सायंकाळी .३० वा.
सत्कार मूर्ती: सन्माननीय जीवनव्रती श्री. प्रवीणजी वसंतराव दाभोळकर
              राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली संस्थेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दिला जाणारा स्वामी विवेकानंद पुरस्कार यावर्षी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे संयुक्त महासचिव प्रवीण दाभोळकर यांना संस्थाध्यक्ष डॉक्टर सुभाष वाघमारे यांच्या हस्ते रविवार दिनांक 12 जानेवारीला प्रदान करण्यात आला.शाल, श्रीफळ ,तुळशीचे रोप, स्मृतिचिन्ह ,मानपत्र रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते याचबरोबर संस्थेतील विष्णुनगर शाळेचे शिक्षक श्री. सुनील पांचाळ यांच्या सिद्धहस्त कुंचल्यातून साकारलेले  श्री. प्रवीण दाभोळकर यांचे जलरंगातील व्यक्तिचित्र त्यांना भेट देण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष डॉ श्री सुभाष वाघमारे ,उपाध्यक्ष श्री विलास जोशी, कार्यवाह डॉ श्री दीपक कुलकर्णी उपस्थित होते.
  प्रास्ताविकात डॉक्टर श्री सुभाष वाघमारे यांनी स्पष्ट केले  की कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिला स्मारकचे हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष  असल्याने यावर्षी दाभोळकर यांना पुरस्कार देण्याचे ठरले.
   यावेळी श्री दाभोळकर यांचा जीवन प्रवास मुलाखतीद्वारे शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ दिपाली काळे यांनी उलगडला .यावेळी जीवनव्रती म्हणून काम करण्याची प्रेरणा मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून मिळाल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना श्री दाभोळकरांनी स्पष्ट केले. त्यात तीन मैलांचे दगड ठरले. १९७५ मध्ये आणीबाणी विरोधात सत्याग्रह करण्याची परवानगी घरून नाकारली, अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर नौदल आणि हवाई दलामध्ये जाण्याची संधी हुकली,१९७८ मध्ये विवेकानंद केंद्रात झालेले 21 दिवसांचे योग शिबिर हे महत्त्वाचे ठरले. तसेच केंद्राच्या कामामध्ये झोकून देण्यासाठी विवेकानंद शिला न्यासाचे निर्माते एकनाथ रानडे यांच्या साधना ऑफ सर्विस या पुस्तकाचा प्रभाव पडला असेही ते म्हणाले.केंद्रांच्या शाळांमधील शिक्षक स्वामी विवेकानंदांचे विचार त्यांचे जीवन व्यवहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. निवासी शिबिरांमधून यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते असे त्यांनी सांगितले. सहभागी  होण्यासाठी काय करावे लागेल असे विचारले असता पूर्वांचलातील विवेकानंद केंद्रात काम करण्यासाठी काही निश्चित वेळेची हमी घ्यावी लागेल तेथील वातावरणाशी जुळवून घेण्याची मानसिकता निर्माण करावी लागेल असे सांगितले.
देशातील प्रत्येक जिल्ह्यात विवेकानंद केंद्राला पोहोचवणे.संपर्क, संग्रह ,संस्कारव्यवस्था या  स्वामींनी सांगितलेल्या  सूत्रांवर  अधिक जोमाने काम करणे ह्या गोष्टींची आवश्यकता आहे.यावेळी त्यांनी विवेकानंदांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी  गुवाहाटी  येथे स्थापन झालेल्या विवेकानंद केंद्राच्या इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर च्या उभारणी संदर्भात माहिती दिली.पूर्वांचल मधील विकास प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या हिंदू बुद्धिष्ट संवादाचा ही आवर्जून उल्लेख केला.
        कार्यक्रमाचे ईशस्तवन विष्णुनगर तर स्वागत गीत दत्तनगर माध्यमिक या विद्यार्थ्यांनी सादर केले सत्कारमूर्ती यांचा परिचय सहकार्यवाह श्री .प्रमोद उंटवाले यांनी तर आभार स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला पुरस्कार प्रदान समितीचे प्रमुख संस्था कार्यकारणी सदस्य श्री . नरेंद्र दांडेकर यांनी केले.
      सत्कार मूर्तींना देण्यात आलेल्या मानपत्राचे शब्दांकन सजावट वाचन विष्णुनगर माध्यमिक शाळेचे शिक्षक श्री सुनील पांचाळ यांनी केले. वैयक्तिक गीत गायन विष्णुनगर प्राथमिक  चे श्री. दत्ताराम मोंडे  यांनी केले. कुमार श्रेयस व्यासयाने गायलेल्या संपूर्ण वंदे मातरम ने या तीन दिवस चाललेल्या सोहळ्याची सांगता झाली.