स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला व पुरस्कार प्रदान समारंभ - २०२०

Source :    Date :07-Jan-2020

       
1_1  H x W: 0 x
स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला पुरस्कार प्रदान समारंभ - २०२०

         राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला पुरस्कार प्रदान कार्यक्रम शुक्रवार दि.10 जानेवारी ते रविवार दि.12 जानेवारी या तीन दिवसात संपन्न होणार आहे. या व्याख्यानमालेचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्याचे प्रभारी राष्ट्रीय सचिव श्री. सुनील देवधर यांच्या व्याख्यानाने होणार आहे.

              11 जानेवारी रोजी डॉक्टर ललिता दिपक नामजोशी (विवेकानंद केंद्र,डोंबिवली नगर संचालक)यांचे व्याख्यान होणार आहे . रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून यंदाही स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार यंदा सन्माननीय श्री. प्रवीण वसंतराव दाभोळकर (संयुक्त महासचिव विवेकानंद केंद्र) यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉ.श्री.सुभाष वाघमारे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार विवेकानंद केंद्र शिलास्मारक, कन्याकुमारी याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रदान करण्याचा संस्थेचा मानस आहे.

               पहिले दोन दिवस ही व्याख्यानमाला संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेच्या दत्तनगर शाखेत संध्याकाळी :०० वाजता होणार आहे. पुरस्कार प्रदान समारंभ संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेच्या दत्तनगर शाखेत संध्याकाळी :३० वाजता होणार आहे.
1_1  H x W: 0 x
1_1  H x W: 0 x