स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला आणि पुरस्कार प्रदान समारंभ - सन २०२०

Source :    Date :08-Jan-2020

              *स्वामी विवेकानंद व्याख्य   
             राष्ट्रीय शिक्षण संस्था ,डोंबिवली 
      *स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला आणि पुरस्कार प्रदान समारंभ*
  * सन २०२०*

             विद्येचे प्रति माहेरघर असलेल्या डोंबिवली शहराचा मानबिंदू *स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला आणि पुरस्कार प्रदान समारंभ - सन २०२०* चे आयोजन शुक्रवार दि. १० जानेवारी ते १२ जानेवारी, २०२० ह्या तीन दिवसात केले आहे. सन १९९३ हे राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवलीचे "रौप्य महोत्सवी वर्ष" होते. त्यानिमित्ताने करण्यात आलेला एक समाजप्रबोधनपर संकल्प म्हणजे ही व्याख्यानमाला... सन १९९८ पासून सुरू करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेचे हे तेविसावे वर्ष आहे.

                सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक, वैज्ञानिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणार्‍या दिग्गज व्यक्तिमत्वाला "स्वामी विवेकानंद" पुरस्कार प्रदान करून गौरवांकित केले जाते. आत्तापर्यंत संस्थेने विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, प्राचार्य राम शेवाळकर, समाजसेवक नानाजी देशमुख, पद्मभूषण जयंत नारळीकर, डाॅ. रघुनाथ माशेलकर, जलसंधारणतज्ज्ञ माधवराव चितळे, जे. एफ. रिबेरो, डोंबिवली भूषण शं. ना. नवरे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, वैज्ञानिक मोहन आपटे, ज्येष्ठ साहित्यिक दाजी पणशीकर, संगीतकार श्रीधर फडके, अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक, ज्येष्ठ दिग्दर्शक विनय आपटे, शिक्षणतज्ज्ञा रेणू दांडेकर, पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी, माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी, शिक्षणतज्ज्ञ इंदुमती काटदरे ह्या नामांकित मान्यवरांना सन्मानित करणारी ही व्याख्यानमाला डोंबिवली नगरीचा केंद्रबिंदू झाली आहे.
           हे वर्ष कन्याकुमारी येथील "स्वामी विवेकानंद शिला स्मारका"चे "सुवर्णमहोत्सवी वर्ष" आहे. ह्याचेच औचित्य साधून "स्वामी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी"चे जीवनव्रती सन्माननीय श्री. प्रवीण वसंतराव दाभोळक ह्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवलीचा तेविसावा स्वामी विवेकानंद पुरस्कार संस्थाध्यक्ष डाॅ. सुभाष कृष्णा वाघमारे ह्यांच्या शुभहस्ते प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
             सन २०२० ची ही व्याख्यानमाला स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, छत्रपती भवन, आयरे रोड, दत्तनगर, डोंबिवलीच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
                 शुक्रवार दिनांक १० जानेवारी, २०२० ह्यादिवशी सायंकाळी ७.०० वा. "पूर्वांचलातील बदल" ह्या विषयावर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव सन्माननीय श्री. सुनिल देवधर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत तर दुस-या पुष्पात शनिवार दिनांक ११ जानेवारी, २०२० ला सायंकाळी ७.०० वा. " स्वामी विवेकानंदांचा जीवनाभिमुख वेदांत" ह्या विषयावर सन्माननीय डाॅ. ललिता दीपक नामजोशी व्याख्यान देणार आहेत. आणि रविवार दिनांक १२ जानेवारी, २०२० ला "जागतिक युवक दिन" तसेच " स्वामी विवेकानंद जयंती" दिनी सायंकाळी ६.३० वा. स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न होणार आहे.
           राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या ह्या व्याख्यानमाला व पुरस्कार प्रदान समारंभाच्या तीन दिवसीय सांस्कृतिक पर्वणीसाठी डोंबिवलीकर मान्यवर नागरिकांची, विवेकप्रेमी रसिकांची दरवर्षी कायमच लक्षणीय उपस्थिती असते. 
            आपलीही उपस्थिती प्रार्थनीय आहे. सोबत निमंत्रण पत्रिका जोडली आहे. तेच निमंत्रण समजून आपण ह्या तिन्ही दिवशी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
                                    *स्वामी विवेकानंद व्याख्य
 
 
 
                                               *स्वामी विवेकानंद व्याख्य
 
 
                                               *स्वामी विवेकानंद व्याख्य
                                                                   *स्वामी विवेकानंद व्याख्य 
 
 
                                                        *स्वामी विवेकानंद व्याख्य